पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३०)

चढली तरी पत्करेल असें म्हणत, व आज नाहीं उथ चढेल, या आशेत, - सहकारिता करून, आपली व आपल्या जित समाजाची उन्नती करून घेतली पाहिजे, असा या सरदार मंडळींच्या मनाचा सिद्धांत होता. शिवाय सहकारि- तेचा मार्ग मऊ, सुरक्षित, व फायद्याचा अथवा फायदेशीर होणारा असतो; अर्थात् असा सहकारितेचा मऊ, सुरक्षित, फायदेशीर, सुखकारक व वैभव- दायक मार्ग सोडून, असहकारितेच्या खडकाळ, कांटेरी, धोक्याच्या व नुक- सानकारक आडमार्गाने जाऊन, त्या पापाचें घुढे प्रायश्चित भोगा कशाला, व आपल्या जन्माचे धिंडवडेही करून ध्या कशाला १ असल्या विचारसरणीची त्यावेळची मराठा सरदार मंडळी होती. उलटपक्षी शहाजीचें, एखाद्या राज्य- कर्त्या प्रमाणें वैभव असूनही त्यानें सहकारितेच्या वैभवाचा त्याग करून स्वतंत्र होण्याचा उद्योग आरंभिला होता, हेच शहाजीच्या चरित्रांतील महत्वाचें, मुख्य, व मननीय वैशिष्य आहे, आणि त्यामुळेच शहाजी हा एक अलौकिक पुरुष होऊन गेला, आणि त्यानें शिवाजीच्या खालोखाल राष्ट्रीय कामगिरी बजाविली, असेंच निःशंकपणे म्हणणे प्राप्त आहे.
 बादशहा शहाजहान याचा बलिष्ठ प्रतिस्पर्धी खानजद्दान लोदी याला मदत देऊन त्याला दख्खनचा मालक करावा, व लोदीला यश मिळवून दिल्यानंतर त्या यशाच्या वांटणी करून घेऊन त्या ठिकाणी प्रकटपणें आपलें स्वराज्य स्थापन करावे, हा शहाजीचा पहिला डाव होता; पण तो शहाजहान यानें साफ उधळून दिला व त्याबरोबरच शहाजीच्या स्वराज्यस्थापनेचा हा पहिला प्रयत्न निष्फळ झाला.
 शहाजीनें इ० सन १६२६ पासून इ० सन १६३६ पर्यंतच्या दहा वर्षांच्या काळांत निजामशाहीच्या नावानें राज्यकारभार सुरू केला. हा त्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊन जर त्याच्या कारभारीपदाला स्थैर्य आले असते तर, भावी काळांत, कृतघ्नतेचा व स्वामिद्रोहाचा प्रतिपक्षाचा आरोप निमूटपणे ऐकून घेऊनही, निजामशाही राज्यलक्ष्मांचा तो स्वतःच मालक बनला असता; पण शहाजहान याने शहाजीचा हा दुसराही डाव साफ उधळून दिल्यावर, त्याच्या स्वराज्य संस्थापनेच्या दुसन्या प्रयत्नाचाही बोजवारा उडाला, आणि त्याला नाइलाजानें आदिलशाहाची मनसबदारी पस्करावी लागली.