पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२४ )

नच ओळखून त्यास दादाजी ( कोंडदेव) व जिजाबाई यांच्या स्वाधीन करून आपल्या पुणे प्रांतांतील स्वतंत्र जहागिरीत, विजापूरापासून दूर ठेवून दिले. "

 " शिव जी लहानपणापासूनच स्वकीयांच्या संगतीत आणि स्वतंत्रतेच्या वातावरणांत वाढला; वडिलांनी दोन तपे परकीय सत्तेशी एकनिष्ठ राहून जी कर्तबगारी केली, तिचें फळ त्यांना अखेरीस कसे मिळाले, तें जाणून आपल्या पराक्रमाला स्वतंत्र अधिष्ठानाचा आश्रय घेण्याचा त्याने संकल्प केला. कोण- त्याही मुसलमानी शाशी सहकारित करावयाची नाही, अर्धे जरी त्याचें व्रत ठ लें होतें तरी तो चतुर राजकारस्थानी पुरुष असल्याने त्यानें उतावळें- पणाने आपल्या मनांतील हेतु योग्य वेळ येईपर्यंत जाहीर केला नाही. त्याच प्रमाणे शहाजाच्या सहकारितेचें फळ जी जहागीर, सेना, मुत्सद्दीमंडळ, आणि संपत्ति यांचाही त्यानें अग्देर केला नाही, उलट या सर्व साधन सामुग्रीचा आणि बापाच्या नांवलौकिकाचा जितका फायदा करून घेतां येईल तितका त्यानें करून घेण्यांत कसूर केली नाही. राजवाडे आपल्या प्रस्तावनेत लिहि- तात की, " दरबरी, मुत्सद्दी, लष्करी सरदार, लढाऊ सामान, जेधे आदि- करून शहाण्णव कुळींच्या मराठ्यांचे साहाय्य व शहाजीच्या नांवाचा दरारा इतक्या देणग्या शहाजीकडून शिवाजी ५ मिळाल्या; यास्तव शहाजीलाहि स्वराज्य स्थापनेच्या श्रेयाचा वाटेकरी करणें इतिहासास प्राप्त आहे. " परंतु यांत राजवाड्यांची दुहेरी चूक आहे. ( कारण ) जे मुत्सद्दी व सरदार शिवाजीला आरंभापासून अनुकूळ झाले, त्यांचे त्यावेळेपावेतो महत्व तितपतच होते; आणि जेथे, बांदल, वगैरे थोडेसे सरदार व देशमूख अपवादा दाखल सोडून दिल्यास निजामशाहीत किंवा आदिलशाहीत नाव गाजविलेले असे सरदार शिवाजीस सह्यभूत तर झाले नाहीतच, पण उलट शिवाजीच्या कार्याची खंबीर पायावर उभारणी होईपर्यंत त्यास त्यांनी विरोधच केला. मोरे, निंबाळकर, घोरपडे, सावंत, मोहिते, वगैरे सरदार आरंभापासूनच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला अनुकूल असते तर शिवाजीचें कार्य कितीतरी स्कर झाले असते. पण परकी शत्रू बरोबरच स्वकीय शत्रूशी दोन हात करून शिवाजीनें आपल्या वर्चस्वाचा जो पाया लातला, त्यांत शहाजीला वांटेकरी