पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२५ )


करितां येत नाही. शिवाय " क्रियासिद्धिः सत्वे भवति महत। नोपकरणे " हा न्यायही विसरून चालावयाचें नाहीं. शहाजीनें स्वतःची जेवढी कमाई शिवाजांच्या स्वाधीन केली, तिच्याहून किती तरी पटींनीं अधिक कमाई केलेले, व हिंदुस्थानभर नांव गाजविलेले, मानसिंग, जसवंतसिंग, जयसिंग, इत्यादि रथी महारथी दिल्ली दरबारी होऊन गेले; पण दिल्लीच्या मोंगली सत्तेचें मूळ त्यांना द्दलवितां आलें नाही. शिवाजीनें जे असले अचाट च अद्वितीय पराक्रम करून दाखविले, त्यांचे श्रेय अर्थात् त्याच्याच अलौकिक बुद्धिमत्तेस, घाडसास व राजकीय थोरणास दिले पाहिजे, "

 "शहाजीच्या वेळेपर्यंत देशांतील मराठ्यांची बहुमत संख्या यवनादींची सेवा करण्यांत दूषण मानावयाच्या ऐवजी प्रायः भूषणच मानीत असे. हा राष्ट्रघातक ओघ बदलून देशांतील सर्व मराठा एका ठार्थी मेळवावा, ही उच्चतम राष्ट्रीकरणाची सल्ला रामदासांनी शिवाजीस दिली. समर्थांनी महारा ष्ट्रांत राष्ट्रभावना जागृत केल्याने जे मराठे सरदार व बारगीर पूर्वी शहा- जीच्या प्रयत्नाकडे वैर भावाने किंवा मत्सरबुद्धीने पाहत असत, त्यांना शिवाजीच्या ध्येयाविषय आपलेपणा वाटू लागला; या राष्ट्रीयत्वाच्या जाग तीच्या जोरावर शिवाजीचा स्वरराज्यवृक्ष चोहों बाजूस फोफावूं लागला; आणि त्याचें मूळ वर इतकें चिवट बनलें कीं, अवरंगजेबानें त्याच्यावर तीस वर्षे आघात केले असतां, तें मूळ तुटण्याऐवज अवरंगजेबाच्या हातातील सत्तारूपी शस्त्रच बोथट होऊन गेलें. एतावता शहाजीच्या साघनसामुग्रीप्रमाणेच रामदासांच्या महाराष्ट्र धर्माच्या शिकवणीचा शिवाजीस कल्पनातीत दुजोरा मिळाला. तथापि शिवाजीच्या अंगी नीतिमत्ता, निःस्वार्थता, न्यायप्रियता, समबुद्धि, आणि अष्टपैलू मुत्सद्देगिरी, हे अलौकिक गुण नसते, व त्यांच्या योगानें महाराष्ट्रीयांची अंतःकरणें विकसित झाली नसती तर समर्थांचा उप. देश अरण्यरुदनवत् झाला असता. शहाजीच्या कर्तबगारीत सहकारितेच्या दोषामुळे स्वार्थाची जी छटा दिसत होती तिचा लवलेशही शिवाजीच्या चारित्र्यांत दृष्टिगोचर न झाल्यामुळे प्रत्यक्ष त्याच्या शत्रूपक्षीयांसही तो आद-