पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२३ )

कोणी फारशी पर्वा केली नसती. इहलोकांतल्या आपल्या कोट्यावधि देश- बांधवांना पारतंत्र्याच्या नरकातून काढून स्वराज्याच्या स्वर्गात नेऊन ठेवता- आले तर स्वामिद्रोहाच्या पातकामुळे परलोकांत स्वतःपुरती नरकाची शिक्षा भोगण्याला कोणीही राष्ट्रवीर तयार होईल. पण या स्वामिद्रोहाच्या आक्षे- पाचे पात्र या लोकींच भोंवतें; व तें मनसबदारास स्वराज्य पचूं देत नाहीं. अशा मनसबदारानें आपलें पूर्वायुष्य स्वतःची बढती करून घेण्यांत घालवि लेले असतें; व त्या वेळेपासूनच त्याच्या भाईचंदांकडून त्याच्या उदात्त हेतूवा विपर्यास केला जातो, व ते त्याचे शत्रू बनतात. जेते वर्गातील अधिका- व्यानंतर जितवगीतला हा उपटसुंभ आपणांस वरचढ होत असलेला पाहून मत्सराने त्यांना पूर्ण पछाडलेले असते; व त्याचा नायनाट करण्याकरितां ते टप- लेले असतात. अशा परिस्थितीत शहाजासारख्या सहकारी मनसबदारानें परकी सत्ता ढकलून देण्याचा कितही प्रयत्न सुरू करतांच त्याला दुहेरी -शत्रूचा मारा सहन करावा लागतो; आणि त्या वावटळीत त्यानें सामर्थ्याचे परकीय अधिष्ठान तर आपण होऊन सोडलेलेच असतें, व स्वकीय अधिष्ठान मिळणें पूर्वकालीन विश्वासाच्या अभाव त्यास दुर्घट होतें. "

अशा त्रिशंकूच्या स्थितीत दुसरा कोणी लेचापेचा सरदार असता तर तो चिरडूनच गेला असता; स्वकीय आणि परकीय सकारण व निष्कारण शत्रूंस दाद न देतां शहाजी बचावला, यांतच त्याचें धैर्य शौर्यादि गुण व्यक्त होतात. या अनुभवानें शहाणपण शिकून त्यानें स्वतः पुनः अदिलशाहीशीं सहकारिताच स्वीकारिली; आणि कर्नाटकांतील मांडलिकी राज्याधिकारावरच दो बाह्यतः संतुष्ट राहिला. पण त्याच्या अंतःकरणांतील स्वराज्य स्थापनेची -तळमळ थंडगार पडली नव्हती; आपलें ध्येय स्वतःस कां साधर्ता आले नाहीं, याचा सर्व बाजूंनी विचार करून आपल्या प्रतापशाली पुत्राच्या हांतून ध्येय सिद्धीस नेण्याची त्याने ईर्षा बाळगली; आणि स्वतःस आड आलेली विमें आपल्या पुत्रास घातक होऊं नयेत, या विषयीं त्याने प्रथमपासूनच सावधगिरी चाळगिलो. परकी राजसत्तेशीं असहकारिता करून टिकाव धरण्या इतकी शक्ति आपल्या जेष्ठ पुत्राच्या म्हणजे संभाजीच्या अंगी नाही, असे पाहून त्यास त्याने आपल्या बरोबर घेतलें; आणि शिवाजीच्या अंगचें तेज लहानपणापासू-