पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

करीत असत; परंतु तेथील शेतकऱ्यांचा व या उभयतां बंधूंचा जमीनीवरून वाद उपस्थित झाल्यामुळे ते देऊळगांव येथून निघून दौलताबादेजवळील वेरूळ या गांवीं येऊन तेथे वास्तव्य करून राहिले; व पुढें इ० सन १५७७ मध्ये त्यांनी शिंदखेडकर लखूजी ऊर्फ लुकजी जाधवराव याच्या पदरी बारागीर म्हणून नौकरी पतकरिली, व त्यांना त्या वेळेपासून पंक्तीस भोजन व पांच होन पगार प्रत्येकी दरमहा मिळू लागला; व त्यांनी लवकरच जाधवरा- वाची मर्जी उत्तम प्रकारें संपादन केली.


 मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपति शिवाजी याची माता जिजा- बाई ही याच लुकजी जाधवरावाची कन्या असल्यानें, या जाधव घराण्याची त्रोटक हकीकत या ठिकाणी देणे आवश्यक आहे म्हणून, ती दिलेली आहे. लक्ष्मणदेव, लखूजी ऊर्फ लुकजी जाधवराव शिंदखेडकर, ( इ० सन १५७१ ते इ• सन १६२९ ) हा देवगिरीकर रामदेवराव यादव ऊर्फ जाधव यांच्या घरा ण्यांतील असून त्याच्या चार पिढया अगोदरपासून म्हणजे ठाकूरजीपासून ( इ. सन १३८० ते इ. सन १४२९ पर्यंत ) शिंदखेड येथील देशमुखांचें वतन या घराण्याकडे चालू होतें. देवगिरीकर रामदेवराव यांस शंकरदेव व भीमदेव असे दोन मुलगे होते; त्यापैकी शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव ( इ. सन १३१२ ते इ. सन १३८०) यानें इसन गंगू यांस बहामनी राज्य स्थापन करण्यांत मदत केली होती; व बागलाण प्रांतांत कांहीं प्रदेश हस्तगत करून घेऊन तो तिकडेसच रहात होता. पुढे त्याचा मुलगा ठाकूरजी यानें शिंदखेड येथे जाऊन तेथील देशमुखी वतन मिळविले. पुढे त्याचा मुलगा भूखणदेव ऊर्फ भेतोजी यानें खानदेशांतील बराच प्रदेश मिळवून बहामनी दरबारांत आपले महत्व वाढविले. त्याचा मुलगा अचलकर्ण ऊर्फ अचलोजी


 या देवस्थानाच्या व्यवस्थेसंबंधी राजे, सार्वजनिक लोक, व हरीसाचें घराणे, यांच्यामध्ये वेळोवेळी कोटांत दावे झाले असून हल्लीं या देवस्थानाची व्यवस्था दिवाणी कोर्टामार्फत कमीटी नेमून चालली आहे.

 येथे जाधवरावांचा एक किल्ला, व राव जगदेव जाधव याची बायको दुर्गा- बाई हिची " मोती समाध " या नांवाची समाधी असून ती जाधवरावांची -दोन्हींह। स्मारकें आजतागायत कायम आहेत.