पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)

याच्या वेळेस बहामनी राज्य नष्ट झालें, व शिंदखेडकडील प्रदेश निजामशाही अमलाखाली आला. या काळांत प्रसिद्ध कंबरसेन हा निजामशाही राज्याचा दिवाण होता, त्याच्या कारकीर्दीत निजामशाहीत मराठ्यांचा पुष्कळच उत्कर्ष झाला, व त्यानें अनेक मराठा सरदारांना निजामशाही सैन्यांत मनसबी दिल्या. त्यावेळीं अचलकर्ण ( इ. सन १५०० ते इ. सन १५४० ) यांसहि पांच हजार स्वारांची मनसबी दिली. त्याचा मुलगा विठ्ठलदेव हाही असाच निजाम- शाही राज्यांत मनसबदार असून तालीकोट जवळील विजयानगरकर विरुद्धच्या युद्धांत त्यानें निजामशहातर्फे भाग घेतलेला होता. त्याचाच मुलगा हा लक्ष्मण- देव ऊर्फ लुकजी जाधव हा असून तोहि निजामशाहीत पांच हज्जारी मनसब दार होता; या लुकजीनें चांदबिबीस अकबराशी युद्ध करण्यांत उत्तम मदत केली; त्यामुळे चांदबिबीने त्याची मनसबदारी वाढविलो, व तो बारा हजारी मनसबदार बनला; आणि या मनसबीच्या खर्चासाठी त्यास एक स्वतंत्र जद्दा- गीरही तोडून देण्यांत आली. या लुकजी जाधवरावाचें निजामशाही दरबारांत अतिशय वजन असून त्या काळांतील सर्व मराठे सरदारांत तो प्रमुख, शूर, व कर्तबगार म्हणून त्याची ख्याती होती. लुकजी जाधव याचे देशमुखीचे गांव-छत्रपति शिवाजीची माता जिजाबाई हिचे माहेरचें गांव-शिंदखेड हैं वन्हाडांत बुलढाणा जिल्ह्यांत मेहकर तालुक्यांत, मेहकरपासून अदमासें वीस मैलांवर, निजामच्या राज्याच्या सरहद्दीवर आहे. यांस " शिंदखेड राजा " असेही म्हणतात.

 दक्षिणतील मुसलमानी राज्यांत जे मराठा सरदार स्वपराक्रमानें उदयास आले, त्यांत शिंदखेडचे जाधवराव हे प्रमुख व प्रख्यात आहेत. वन्हाडांतील किबहुना महाराष्ट्रांतील सर्व जुन्या इतिहासप्रसिद्ध घराण्यांत यांच्या तोडीचें दुसरे घराणे नाही. देवगिरीकर यादव ऊर्फ जाधव यांचे राज्य मुसलमानांनी बुडविल्यानंतर त्यांच्या शाखा निरनिराळ्या दिशेस पसरल्या, त्यांतील एक शाखा दौलताबाद येथे येऊन किल्ल्याचे नजीक पातशाहास भेट्न लासनेर, परगणे पैठण, गंगातीर येथे छावणीस आपले जमीयतसुद्धां येऊन राहिली; व नंतर थोडक्याच काळांत ती शिंदखेड येथे येऊन स्थाईक झाली; हीच शाखा म्हणजे लुकजी जाधवराव यांचे घराणे होय.