पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११)

म्हणजे, याचा अर्थ द्दा उघड होतो कीं, " उत्तरेकडील रजपूतही दक्षिणे- कडील भोसल्यांना सहानुभूति दाखविण्यास तयार होते, व भोसल्यांना ते आपले भाईबंद समजत असत; " अर्थात् भोसल्यांचा वंश उदेपूरच्या राज- घराण्यापैकीच आहे, हीच गोष्ट निर्विवाद खरी आहे, व वरील विवेचनावरून ती खरी आहे, असेच उघड उघड निदर्शनास येत आहे.

 संभाजीचा मुलगा शिवाजी ऊर्फ बाबाजी हा इ० सन १५३३ मध्यें 'जन्मास आला. त्यास मालोजी व विठोजी असे दोन मुलगे होते. यापैकी मालोजी हा इ० सन १५५० मध्ये, व विठोजी हा इ० सन १५५३ मध्ये जन्मास आला. हे उभयतां बंधू वर्गांत आल्यावर पहिल्यानें कांहीं काळ देऊळगांव + येथे आपली शेती सांभाळून तिजवर आपला उदरर्निवाह


 + देऊळगांव, हे ठिकाण व-हाडांत बुलढाणा जिल्ह्यांत बुलढाण्यापासून आजमासें साठ मैलांवर, चिखली तालुक्यांत आहे. या गांवाचें पूर्वीचे नांव देवळी हे असून तें पूर्वी अगदीं खेडगांव होतें; तें, पुढे जाधवरावांच्या घराण्यांतील राखोजी या नांवाच्या दासीपुत्रानें तेथें वस्ती वाढवून भराभराटीस आणिलें; नंतर तें जाधवांचे राहण्याचे ठिकाण झाले, व त्यावेळेपासून त्यास " देऊळगांव राजा " असे म्हणूं लागले. राव- जगदेवराव जाधव यानें येथील बालाजीची स्थापना केली असून भावी काळांत है देवस्थान फारच महत्त्वास चढले. या बालाजीची स्थापना जरी जाधव- रावांच्या घराण्यांतून झाली, तरी त्या संस्थानाची खरी वाढ निरनिराळ्या दुसऱ्याच पुरुषांनी केली; त्यांत हरीसा, रामासा, व नवलसा त्या लाड साव- कारांच्या तीन पिढ्यांत ती विशेष झाली. हॅ घराणे फार श्रीमंत असून त्यांच्याकडे संस्थानचा कारभार असतांना त्यांनी सर्व राजेरजवाड्यांकडून ह्या संस्थानास इनाम जमीनी व वर्षासने मिळविलीं.

 हे देवस्थान आसपासच्या भागांत विशेष प्रसिद्ध असून दरवर्षी आश्विन महिन्यांत या ठिकाणी मोठी यात्रा भरते, व मोठ्या थाटाचा उत्सव होतो; व देवाचे दुकानांत व्यापारी व इतर लोकांकडून हजारों रुपयांची कानगो ( देणगी ) येते.