पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१० )

अभिलाष करूं नये; वर्ष सहा महिने जाले, न आला तरी सरकारांत दाखल करावा. यांत तफावत कोणी केल्यास त्याचे पारिपत्य करावे." याप्रमाणे नियम साबाजापंतानी अमलांत आणिलें. ( शिवप्रताप; पृष्ठ २८ पहा. ) हा चतुर साबाजी शहाजीचे वेळचा असून तो मुरार जगदेव, व मलिकंबर, यांच्या तालमेंत तयार झालेला होता. त्याचे अनुकरण शहाजीनें केलें, आणि शहाजी- च्या अनुषंगानें दादोजी कोंडदेव, नारोपंत हणमते व शिवाजी यांनां ह्या मुत्सद्देगिरीचा पुढे चांगला उपयोग झाला. सारांश, शहाजी हा राज्यकार भारत निपुण व युद्धकलेत निष्णात शूर असा पुरुष होता. मराठा मंडळीस राज्यकारभार समजत नाही, असे विधान करणारांनी शहाजी चे उदाहरण पहावें." “लोकाभिमान व शौर्य वगैरे जे गुण पुढे शिवाजीच्या अंगी पल्लवेत झाले, ते शहाजीमध्ये अंकुरावस्थेत होते; आणि निजामशाहीच्या तर्फे झगडतांना त्यांचा प्रादुर्भाव झाला होता. मुसलमानी राजघराण्यांवर शहाजीची भक्ति मूळपासूनच विशेष होतो. त्याचे स्वतःचें नांव शहाजी व भावाचें शरीफजी, हो पीरावरून ठेविलेली होती. सन १६५६त अदिलशहा मरण पावला. त्या वेळेस मुसलमानांचे अशीच विधि शहाजीनें मनापासून पाळिलें. तो मोकळ्या मनाचा, निष्कपटी, व शूर पुरुष प्रमाणे कित्येक वेळां प्रसंग पाहून वागण्यांत कुशल नव्हता; परंतु या गोष्टात शिवाजी बापाच्या उलट स्वभावाचा होता. शिवाजी धूर्त, होतां होई तो समेरासमोर लढण्याचा प्रसंग न आणित कार्यभाग उरकून घेणारा होता. शिवाजी मधुर, परंतु मित भाषण करणारा असून शत्रूचेही मन तेव्हांच गार करून सोडी. ती विद्या शहाजीस माहीत नव्हती. सारांश, शिवाजीसारख्या पराक्रमा पुत्रास शोभणारा बाप शहाजी होता, यांत संशय नाही. "

 "शद्दाजीचें खरें कर्तृत्व, निजामशाहीत इ. स. १६३३ च्या पुढें दिसून आलें. निजामशाही मोगलांच्या हातांत सन १६३३ त पडली असतां, चार वर्षेपर्यंत शहाजीनें मोगलांस जुमानिले नाहीं. इ. स. १६०० मध्ये अकबर बादशहानें निजामशाही जिंकून विजयोत्सव केला; पण तो व्यर्थ होता है जसे मलिकंबराने दाखविलें, तसेच इ. स. १६३३ त शहाजीनें शहाजहान दशहासही दाखविलें. पण इ. स. १६०० तील निजामशाहांतील शक्ति व