पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०९ )


साबाजीस विषाद वांटून त्यानें मोंगलांकडें संधान बांधून त्याचे पदरों जाधवरावास ठेवि, आणि मोंगलांच्या मदतीने शहाजीचा पाडाव केला. ह्या भानगडी चालू असतांच साबाजी मरण पावला, असा उल्लेख आहे. कित्येक बखरीमध्ये असा उल्लेख आहे की, चतुर साबाजी हा अदिलशाहीतील प्रसिद्ध मुत्सद्दी मुरार जगदेव ह्याच्या तालमेत तयार झालेला होता. ज्यावेळेस निजामश हामध्ये कोणी कर्तबगार मुत्सद्दी उरला न हो,तेव्हां साबाजीस निजामशहानें विजपूरकरांकडून विशेष आर्जव करून मागून घेतलें,त्याच्या कर्तबगारीबद्दल बखरीतून खाली लिहिल्य प्रमाणे उल्लेख आढळतो तो:- साबाजी अनंत कारभारी बहुत चतुर, गुणज्ञ, सर्व कला निपुण, विद्वान्, व्यापसव्यांत (म्हणजे दोन्ही हातांनी ) लिहिणार, घुरंधर, कोणत्याही गोष्टोत उणें नाहीं, असे दक्ष होते. त्यांनी संपूर्ण दक्षिण प्रांत, हजरतीची अंमल, तितक्याची नजर पाहणी केला; तें समय बिघोटीची काठी सात हात, पांच हात, त्याजवरील दस्त काय, हक्कदाराचा अंमल किती, सरकारी क'नू कायदे काय, रयतेस सूट कशी असावी, अर्जबाब कशी द्यावी, व्यापारो, उदमी, यांनी सरकारी भरणा कोणता करावा, त्याची बरदास्त कोणती ठेवावी, इत्यादि धारे बांधून, वसाहत पंडित रानाची लागणी करून दिली; याजमुळे त्यासच चतुर सावाजी म्हणत होते; त्यांचा मगतच पादशहाजवळ फारच फार; केवळ विश्वासांतील वागणार; " साबाजी पंतानी कारभाराचा अटोप दौलतीचा केला; साबाजीपंत मर्द, शहाणे, नेकदार, रयतेचा वगैरे बंदोबस्त उत्तम प्रकारें ठेविला; " " साबाजीपंतांनी लावणीचे धारे व जमीन मोजणी वगैरे शिरस्ते केले; अद्यापि प्रसिद्ध वागतात; रयतेवरी जुलूम न करितां राजो राखून दोन रुपये घ्यावें. नापीक जाले तरी सोडावें; कोणास बैल अगर पोटास नसेल, तर त्याचा बंदोबस्त करून द्य वा.अशा रीतीनें आबादी अमरपुरीप्रमाणें उघड मार्गे सावकारी व्यापार करावा. वस्त्रे, भूषणे, अलंकार, ग्रहण करावें; बेपडदा शहरांत व मार्गात फिरावें. सुतळीचा तोडा गमाविला तरी ज्यांस सांपडेल त्यांनी ज्या हद्दीत असेल, तेथील जमीनदाराचे हवाली करावा. ज्याचा जो विषय गेला, तो शोधीत असतां, त्याजला द्यावा;