पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २११ )

न्सन १६३३ तील शक्ति यांत महदंतर असल्यामुळे शहाजीस यश आलें नाही. तथापि शहाजीची योग्यता शहाजहान जाणून होता, म्हणूनच शहा- जीच्या वाटेस तो पुढे गेला नाहीं. सारांश, मलिकंबर प्रमाणेच शहाजीचा लौकिक त्यावेळी चहूंकडे झाला होता. अदिलशहास त्याचा गौरव व दरारा दोनही वाटत होते. गौरव वाटत असल्यामुळे, शहाजीच्या शक्तीचा कर्तब गारीचा - अदिलशहाने आपल्या कामाकडे उपयोग करून घेतला, व कर्नाट- चांतील बंडाळी मोडली, दरारा वाटत असल्यामुळे, त्यास त्यानें स्वतंत्र राहूं दिले नाही. कारण शहाजी स्वतंत्र राहता, तर जे काम पुढे शिवाजीनें केलें त्याचा उपक्रम शहाजीच्याच हातून उघडपणें झाला असता. स्वतः अदल- शहापेक्षा त्याचे सल्लागार रणदुल्लाखान व मुरारपंत यांच्या मनांत शहाजी


 *रणदुल्लाखान हा शहाजीचा जिवलग स्नेही असून, शहाजीवर जेव्हां 'विजापूर येथे प्राणसंकट ओढवले, त्यावेळी त्यानेंच शहाजांविषयों बादशहा- जवळ रदबदली केली व त्यामुळे शहाजवरील प्राणसंकट टळले. या बाबतीत • असा उल्लेख अ ढळतों की ( रायरी बखर पहा ) शहाजीस बाजी घोरपडे मुधोळकर यानें पकडल्यानंतर अदिलशहानें त्यास असा हुकूम पाठविला की, " शहाजीस विजापूर येथे न आणि त्यास तिकडेच ठार मारावें. " ही हकीकत रणदुल्लाखान यांस कळल्यावर त्याला अतीशय वाईट वाटलें; व त्याने शहाजीस प्राणसंकटांतून मुक्त करण्याकरितां खालील युक्ति योजिली, ती अशी की, रणदुल्लाखानानें संसार सोडिल्याचें मीष करून व फकीराचा वेष धारण करून तो बादशहास जाऊन भेटला; व त्यानें मक्केस जाण्याची पर- वानगी मागितली. रणदुल्लाखान हा विजापूरच्या राज्याचा एक आधारस्तंभ असून तो मोठा पराक्रमी सेनानायक होता. त्यामुळे अशा शूर सरदारास -मक्कस जाण्याची परवानगी देऊन आपल्या राज्याचे नुकसान करून घेण्यास अदिलशहा तयार नव्हता. म्हणून त्याने खानाचा हात धरून त्यास आपणा- जवळ बसविलें; व मकेस जाण्याचा बेत रहित करण्याबद्दल त्यास अतीशय आग्रह केला; तथापि खान कांहीं केल्या ऐकेना. तेव्हा अदिलशहानें त्यास " तुमची काय इच्छा आहे ती सांगा, म्हणजे ती मी लागलीच तृप्त