पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०८ )

आमचे काका, यांचे कुटुंबाचे व शरीफजी राजे आमचे भाऊ, यांचे वंशाचे 'तुम्हीं वडोलपणे चालवावे, आणि प्रजापालन करून राज्य करावें. वडील शिवाजीराजे यांनी सर्वांचे संगोपन करून चालवावें, तरी त्यांनी पृथ्वी आक्र- मण करण्याचा इरादा धरिला. तेव्हां ईश्वर कृपेंकरून त्यांचें मनोरथ परिपूर्ण झाले असतां, सर्वांचे संगोपन करावयास अधिकारीच आहेत; करतील; कदाचित् त्यांजवरी समय गुदरला, तरी आम्ही पातशहापासून इतल्ला तोडून, दौलतीचा बचाव करून घेतला आहे ही दौलत तुम्हां उभयतांची म्हणजे ( व्यंकोजी व शिवाजी यांची) परंतु दौलत रक्षावयाकरितां तुम्हीं वडीलपणें सांभाळ करावा. मुख्यार्थ आमचें कुळीं आम्ही, आमचें कुटुंबांत शिवाजीराजे जेष्ठ, त्यांचे ठायीं तुम्हीं; त्यास राजघर्म प्रवाहें तुम्ही वडीलपणें कुटुंबियांचा सांभाळ करणे; पराक्रनी शिवाजी राजांचे तुम्हीं भाऊ; आमचे चिरंजीव; त्यां हून आवडते विशेष अां; तरी सर्वांपासून चांगले म्हणून घ्याल, पदरी वडिलो- पार्जित दोनचार माणसे आहेत, त्यांचे विचारें तुम्हीं चालल्यास तुमचें कल्याण आहे." ( शिवदिग्विजय; पान २०४-२०५ पहा. ) असा शहाजीनें व्यंकोजीस उपदेश केला; हा उपदेश ध्यानांत ठेवण्याजोगा असून पुढे- शिवाजीनें व्यंकोजीजवळ आपला हिस्सा मागितला त्या प्रसंगी त्याचे काम पडणार आहे.

 "शहाजी हा मुत्सद्दीपणांतही फार नामांकित होता; - अतीशय पटाइत होता; व मलिकंबरच्या सहवासांत राहून गनीमा युद्ध, व मुत्सद्दीपणा यांत तो पूर्ण निष्णात बनलेला होता. एवढेच नव्हे तर सतराव्या शतकाच्या प्रथमाघत राज्याचा कारभार हांकणारे शहाजीच्या तोडीचे पुरुष फारचें नव्हतें. यांस प्रमाण, साबाजी अनंत, अथवा चतुर साबाजी म्हणून जो त्याचें वेळीं नांवाजलेला पुरुष होता, त्याची व शहाजीची स्पर्धा पुष्कळ दिवस चालू असून शह जानें चतुर साबाजीस मार्गे टाकिले होते, असे दिसतें, कित्येक बखरीमध्ये असे लिहिले आहे की, निजामशाहीच्या अखेरीस राज्यांत दोन पक्ष झाले; एका पक्षास जाधवराव, फत्तेखान, मलिकंबर, व चतुर साबाजी ही मंडळी असून दुसन्या पक्षास शहाजी होता. निजामशहानें वरील चारही मंडळीस बाजूस सारून शहाजीच्या हार्ती सर्व कारभार दिला. त्याजबद्दल