पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)


सार्वभौम राजाला शोभेल अशी वंशावळ व कुळगोत मुद्दाम बनावट तयार केली गेली, हा अक्षण जयरामाच्या प्रत्यक्ष पुराव्यावरून लंगडा पडतो. शिवाजीच्या वेळींच नव्हे तर शहाजीच्या वेळीं उत्तर हिंदुस्थानांतील अनेक कवी व जयराम हा महाराष्ट्र कवी, खुद्द शहाजी महाराजाच्या व पुरोहित, राजगुरु, वगैरे अनेक संभावित पिढीजाद मुत्सद्यांच्या पुढे, भोसल्यांचा संबंध शिसोद्यांच्या वंशाशी लावतात, यावरून निर्विवाद मान्य करणे भाग पडतें कीं भोंसले हे शिसोदिया रजपुतांच्या वंशांतील होत, अशी परंप- रागत कहाणी शहाजी राजाच्या दरबारी सर्वसंमत होती. ही कहाणी शहा- जांच्या किंवा शिवाजीच्या दरबारींच तेवढी प्रचलीत होती असे नव्हे तर उत्तरेकडील रजपुतांनाही मान्य होतो, सभासदी बखरीच्या तेहतिसाव्या पृष्ठावर जयसिंगाच्या तोंडचे शब्द सभासदाने दिले आहेत ते असे, तुम्ही शिसोदे रजपूत, आम्ही तुम्ही एकाचे एकच आहों" म्हणजे भोसल्यांचे रजपु- तत्व म्हणजे क्षत्रियत्व व शिसोदिया वंशत्व त्या काळी म्हणजे शहाजीच्या काळी दक्षिणेतील व उत्तरेतील विद्वानांना व रजपुतांना मान्य होते, असे झालें. हा शहाजीकालीन पुरावा अकृत्रिम असल्यामुळे विश्वसनीय धरणे प्राप्त आहे... ताप्तर्य “शहाजीचे उपनांव भोंसले, वंश शिसोदे, वर्ण क्षत्रीय ऊर्फ रजपूत, गोत्र कुशिक, मूळ पुरुष वलीपास, ” अशी ग्वाही शहाजीसम- कालीन प्रत्यक्ष साक्षीदार जो जयराम तो देतो, त्याप्रमाणेच शहाजीच्या दरबारी ढुंढरी कवि असून त्यानें ढुंढार भाषेत कवित्व केले त्यांतील मतलब असा. " शहाजीच्या फौजेचें कुच झालेले पाहून कोण विचारिलें कीं, फौज कोठें चालली ? तेव्हां भाटानें उत्तर दिले की, राजगड चितोडच्या दिशेनें फौज जाणार; राजा शहाजी हा चितोडच्या राण्याचा भाऊबंद आहे, तरी भिऊं नका. पण भय न समावून अभेरच्या x राजानें शहाजीला अगोदरच निरोप पाठविला की मी घासदाणा देण्यास तयार आहे; "


 xअंबेर ऊर्फ अंभेर ही जयपूरच्या राज्याची जुनी राजधानी होती; हे शहर हल्लीं मोडकळीस आलेले असून ते जयपूरच्या ईशान्येस सात मैलांवर आहे.