पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९९ )

 (६२) गुजराथी कवी:-- यानें गुजराथी भाषेत शहाजीची स्तुती केली आहे.  ( ६३ ) मोरिर्ना भाट:- यानें बागलाणी भाषेत शहाजीची स्तुती केली आहे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( ६४ ) बगी कवी:- यानें शहाजीच्या स्तुतीपर कवन केले आहे; नव पूर्वपरिचित नाही.
 ( ६५ ते ६८) मोदलराय, कोट्टा पोबराय, लालमनी, घनःशाम, : -- यांनी शहाजीची स्तुती गायली आहे; ह्रीं चारो नांवें पूर्वपरिचित नाहीत.  ( ६९ ) विश्वंभर भाटः– कर्नाटक, कलिंग, व तेलंगण येथील राजांचा शहाजीनें पराभव केला, त्याचा स्तुतीपर उल्लेख या कवीनें आपल्या कवि- त्वांत केला आहे.
 ( ७०, ७१) बलदेव नरायन व अनंत नरायन:- हे उभयतां बंधू असावें असे दिसतें; यांनी शहाजीची स्तुती गायली आहे; या उभयतांचींही नावें अपरिचित आहेत.

 वरील गुणी मंडळी ज्याच्या दरबारी शक १५७५ पासून शक १५८० पर्यंतच्या पांच वर्षांत जयराम कवीनें प्रत्यक्ष पाहिली त्या शहाजी महाराजांचें ऐश्वर्य कोणत्या प्रतीचें होतें, त्याचा अंदाज कोणालाही करता येण्यासारखा आहे; आणि प्रातरुत्थान, राजसभा, व सैन्य यात्रा, यांची जी वर्णनें केली आहेत त्यावरून, त्याकाली शहाजीचा सर्व थाट एखाद्या स्वतंत्र राज्यकर्त्या प्रमाणे असे, ही गोष्ट अंदाजाने नव्हें, तर प्रत्यक्ष पुराव्यानें सिद्ध करता येत आहे.

 थोडक्यांत म्हणजे शहाजीच्या कालांत, शहाजी हा एक अलौकिक पुरुष होऊन गेला, असेच त्याच्या चरित्रावरून उघड होत आहे. निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही व दक्षिणेतील मोंगली बादशादी, ह्या एकाहून एक प्रबळ शह्याशी कर्धी झगडून तर कधीं सख्य करून, त्याने कर्नाटकांत सना- सन धर्माचे व स्वराज्याचें पुनरज्जीवन केलें. शहाजीचें हें स्वराज्य मांडलिकी स्वरूपांतील होतें; आदिलशाही पासून तुटून विभक्त झालेले नव्हतें. शहाजीला
ज्या परिस्थितीशी झगडून आपल्या वर्चस्वाचें ध्येय गांठावयाचें होतें, तो