पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २००)

परिस्थितीच मुळी अशा प्रकारची होती, की त्याहून श्रेष्ठ फल जें स्वतंत्र स्वराज्य ते त्याला त्यावेळी प्राप्त होणे किंवा प्राप्त करून घेता येणे शक्य नव्हतें; इतकेच नाहीं तर शहाजीनें गांठलेले ध्येयही त्याकाली अपवाद म्हणूनच गणण्यासारखे होतें. " सनातनधर्मी प्रचळ मनसबदार जो शहाजी त्याला मलिकंबर व मूर्तिजाशहा ह्यांनी ज्या दिवशीं दुखविले त्याच दिवशी हिंदुस्थानांत सहाशे वर्षे बांधीत आणिलेल्या इस्लामच्या तांत पहिले भग- दाड पडलें, आणि सनातन संस्कृतीवरील इस्लामच्या मगरमिठीतील पहिली गांठ मोकळी झाली. " म्हणजे शहाजीला निजामशाही नें दुखविलें, ही पहिली चूक झाली आणि निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही, बेरीदशाही व मोगली बादशाही यांनी त्यास प्रबळ होऊं दिले, ही दुसरी चूक होऊन तिचा भला भक्कम खिळा बनला; व त्याने ह्या सर्व शाह्यांना आपला प्रताप दाख- विला. ह्या चुकीनें “ नुसती निजामशाहीच खाल्ली नाहीं, तर कुत्बशाही खांकेत मारिली, आदिलशाहीचे लचके तोहिले, बेरीदशाहीचा चकनाचूर होऊं दिला, आणि शेवटी दिल्लांची मोंगलशाही रसातळास पोहोचविली. औरंगझे- बानें शिवाजीस निसटून जाऊं देण्याची एक चुकी केली, तर त्याला सव्वीस वर्षे दक्षिणेत वनवास भोगावा लागून शेवटी हताश होऊन मरावें लागलें. ( परंतु ) शहाजीला मनसबदारी देण्याच्या ( व त्याला एक हिंदुधर्मी प्रबळ मनसबदार बनू देण्याच्या " ) चुकीनें त्याहूनहि घोर धक्का इस्लामास बसला. इस्लामी राजसत्ता हिंदुस्थानांतून कायमची बाद होण्याचा मार्ग खुरा मराठ्यांच्या इतिहासांत शहाजीनें बजाविलेली श्रेष्ठ कामगिरी ही अशा प्रकारची आहे. यवनांची सत्ता खिळखिळी करून मोडण्याच्या पंथास लावण्याचे जे असामान्य कार्य शहाजीनें केले, त्याचें स्वरूप वरीलप्रमाणे आहे; आणि शहाजीनें घडवून आणिलेल्या त्या अलौकिक कार्यामुळे महाराष्ट्र- इतिहासांत शहाजीस शिवाजीच्या खालोखाल श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे.