पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९८ )

देतांना जयरामाने शहाजीच्या अल्लंगगडवरील स्वारीचे वर्णन मोठ्या बहारांचे केले आहे. हा कवि पूर्वपरिचित नाहीं.
 (५२) बालकविः -- नाव दिले नाहीं.
 (५३) रघुनंद रामानुजः -- नांवाचा पूर्वपरिचय नाहीं.
 ( ५४ ) जदुरायः - - या कवीनें शहाजी, व त्याचा रक्षा पुत्र संताजी यांची स्तुती गायली आहे; व नंतर जयरामानें दरबारांतील फाल्गुन मासाच्या वसंत लीलेचे वर्णन केले आहे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
(५५) दुर्गठाकूरः - हा शहाजीच्या सलगीतील कवी दिसतो; राजा ह्याला दर महिना एक होन पगार देत असे; व एकदां राजाने त्याला एक घोडा व पालखी बक्षीस दिली होती. ह्या कर्वोच्या सांगण्यावरून राजानें जयरामाला सत्तावीस मराठी पद्यरत्ने गुंफण्याची आज्ञा केली व ती जयरामानें आनंदानें करून ती, व नंतर एकंदर बारा भाषांत पये करून तीं, सर्व स्तुती- पर पर्छे शहाजी राजास अर्पण केली. पूर्वपरिचित नाहीं.
( ५६ ) सुबुद्धिरावः - हा उत्तर देशांतील ( कानपूरपासून २६ मैलां- वर असलेल्या) घाटमपूरचा राहणारा; याला शहाजीनें कांहीं दिवस आपणा- जवळ ठेवून घेतले होते. या कवीने उत्तर देशी भाषेत शहाजीराजे शिसोदें यांचें स्तुतीपर वर्णन केले आहे. नांव पूर्वपरिचित नाहीं.
( ५७ ) ढुंढरीकविः– यार्ने ढुंढार भाषेत शहाजी हा चितोडच्या राण्याचा भाऊबंद आहे, अशा आशयाचें कवित्व केले; शहाजीच्या चरित्रांत त्या संबंधी उल्लेख केला असल्याने येथें द्विरुक्ती केली नाहीं; नांव पूर्वपरि चित नाहीं.
(५८) अकब्बरपूरचा कविः- यानें पूर्वी भाषेत शहाजीचें स्तवन केलें आहे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
( ५९ ) अनामक पंजाबी कवी:- यानें पंजाबी भाषेत शहाजीची स्तुती केली आहे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
( ६० ) हिंदुस्तानी अनाम कवी:- यानें हिंदुस्थानी भाषेत शहाजीची स्तुती गायली आहे. नांव पूर्वपरिचित नाहीं.
(६१) फारसी कवी:- यानें शहाजीच्या स्तुतीपर फारसीत कवन केले आहे.