पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९२ )

प्रसिद्ध कवीश्वर जगन्नाथ पंडितानें पातंजल भाष्याचा अभ्यास केला असे जगन्नाथानें आपल्या रसगंगाधरांत लिहिले आहे; अनंत शेष हा अलंकार शास्त्रज्ञ होता; त्यानें जयराम कवस समस्या घातली होती; हें नांव परि- चितांपैकी आहे.

 ( १६) संभाजी राजे भोसले; — शहाजी व जिजाबाई यांचा वडील मुलगा व शिवाजीचा वडील भाऊ; यानें जयराम कवीस ( संस्कृत ) समस्या घातली होती; यास विधियुक्त यौवराज्याभिषेक झाला होता; याची हकी- कत शहाजीच्या चरित्रांत दिली असल्यामुळे या ठिकाणी द्विरुक्ती केली नाही.
 ( १७) यलोजी महाले घंटाघोष; - देशस्थ ब्राह्मण महाले, घंटाघोष ही दोन उपनांवें; योग, न्याय मिमांसा, काव्य, नाटक, अलंकार, इत्यादि शास्त्रांत व कलांत निष्णात होता; हा मोठाच विद्वान पंडित असून त्यानें जयरामास समस्या घातली होती; युवराज संभाजीराजे यांचा परम स्नेही; हें नोव पूर्वपरिचित नाहीं.
 ( १८) रघुनाथ पंडित, सबंध नांव रघुनाथ नारायण हणमंते;- नारोपंत हणमंते यांचा मुलगा, हा वयानें तरुण, परंतु बुद्धीनें पोत होता; याची हकीकत शहाजीच्या चरित्रांत दिलेली आहे.
 (१९) सखोपंडित; - अडनांव दिले नाहीं; हा भांडागार, बागा, थट्टी, कलावंत यांच्यावरील अधिकारी असून पगार वाटण्याचे काम त्याच्याकडे असे; सर्व लोकांशी मित्रत्वाने वागण्यांत व मिठ्ठे बोलण्यांत तो प्रवीण असून शहाजी राजाचा तर केवळ बहिश्वर प्राण असे. नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( २०, २१) रघुनाथपंत व लक्ष्मणपंतः- शहाजीराजाच्या दरबारांतील मुत्सद्दी, हे उभयतां लोलिंब कमें म्हणजे नर्म कर्म संपादण्यांत राजाचे साह्य- कारी होते; राणीवंशाची व्यवस्था पाहण्याचे काम यांच्याकडे असावे; नांवें पूर्वपरिचित नाहीत.
 ( २२ ) दत्तो नागनाथ;- शहाजीच्या दरबारांतील मुत्सद्दी असावा; जय- राम कवीचा नातेवाईक; नांव पूर्वपरिचित नाही.
 ( २३) विश्वनाथभट्ट मंगल पाठक:- याजकडेस प्रात:स्मरण उच्च व मधूर स्वरानें पढून राजाला उठविण्याचे काम असे; नांव पूर्वपरिचित नाही.