पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९३)

 (२४) प्रभाकरभट्ट राजगुरू:- राजाचा वर्ष पुरोहित व राजगुरू; त्यांचें चरणतार्थ राजा ग्रहण करीत असे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
 (२५) मल्लीनाथ वंशजः - रघुवंशादि महाकाव्यांवर टीका करणारा मल्लीनाथ हा त्रिचनापल्लोचा राहाणारा, त्याचे तीन चार वंशज आश्रयार्थ राजाकडे आले असतां, त्यांची व राजाची गांठ प्रभाकर भट्ट राजगुरू यांच्या द्वारा जयराम कवीनें घालून दिली. नांवें कवीनें दिलों नाहीत.
 ( २६) भीमरायः - हा जासुांचा मुख्य होता; नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( २७ ) अभेद गंगाधर:-एकोजी ( व्यंकोजी ) राजा संभाजीच्या मृत्यू. नंतर युवराज झाला, त्याचा हा आमाल्य; उपनांव अभेद; हा वेद व्युतन असून अग्निहोत्री असे; मनाचा दयाळू, व पापभीरु असे; त्याची जयराम कवीवर कृपादृष्टि होती.
 ( २८ ) एकोजी, येकोजी ऊर्फ व्यंकोजीराजे भोसले::-शहाजी व तुकाबाई यांचा मुलगा; संभाजी राजाच्या मृत्यूनंतर हा युवराज झाला; याची हकीकत शहाजांच्या चरित्रांत दिली आहे.
 ( २९ ) कृष्णभट्ट विदूषकः - व्यंकोजी राजाच्या पदरचा खुषमस्कया; नांव पूर्वपरिचित नाही.
 ( ३० ) बघेल कवी:- नांव दिलेले नाही.
 ( ३१ ) जनार्दन पंडित:- जनार्दन नारायण हणमंते; ह्याची चालचल- णूक रुबाबदार असून हा शिव व विष्णू या दोन्दीं देवतांचा उपासक होता; कर्नाटकांत शैव व वैष्णव यांचें बंड व द्वैत फार; सबब दोघांचाही मिलाफ एकमेव अद्वितीय ब्रह्मांत म्हणजे भागवत धर्मात करणारा हा मुत्सद्दी शहाजी व व्यंकोजो राजाच्या दरबारी होता; हें पूर्वपरिचित नांव आहे.
 ( ३२ ) यशवंतराव :- हा व्यंकोजी राजाचा श्रीकरणधीश; हा राज्यांतील करवसुलीचा अधिकारी व विद्वान ब्राह्मणांचा कैवारी होता. नांव अपरिचित.