पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९१ )

 (६) विष्णु ज्योतिर्विद; - हा शहाजोचा ज्योतिषी होता; नांव पूर्व परिचित नाही; यानें जयराम कवीस समस्या घातली होती.
 (७) रघुनाथभट्ट चाऊरकर उर्फ चवरे, - देशस्थ; शहाजीचा पंडित; नांव पूर्वपरिचित नाही. यानें जयराम कवीस समस्या घातली होती.
 (८) विश्वनाथभट्ट ढोकेकर;- देशस्थ ; राजाच्या मर्जीप्रमाणे वागण्यांत चतुर; नांव पूर्वपरिचित नाहीं; यानें जयराम कवीस समस्या घातली होती.
 ( ९ ) निळकंठ भट्ट श्रोत्रिय; ( श्रोत्री ) हा राजापुढे भारतादि पुराण बाची; यानें जयराम कर्वास समस्या घातली होती. नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( १० ) प्रल्हाद सरस्वती - देशस्थ; दरबारांतील कधी; यानें जयराम कवीस समस्या घातली होती. नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( ११ ) विश्वेश्वरभट्ट चतुर; - देशस्थ ; हा राजाच्या पदरचा गायक; चतुर हैं उपनांव; ( देशस्थ; निजामशाहीत याच उपनांवाचा साबाजीपंतच तूर या नांवाचा एक अतिशय प्रसिद्ध मुत्सद्दी होता. ) यानें जयराम कवीस समस्या घातली होती. नांव पूर्वपरिचित नाहीं.
 ( १२ ) अकथ्य शास्त्री पलकचेरीकर; - कर्नाटक ब्राह्मण; तत्कालीन प्रसिद्ध विद्वान शास्त्री; यानें जयराम कवीस समस्या घातली होती; नांव पूर्व परिचेत नाही.
 ( १३ ) तुकदेव; - हे देशस्थांत अडनांव आहे; पुराण सांगण्यांत मोठा पटाईत असे; यानें जयराम कवीस समस्या घातली होती. नांव पूर्व परिचित नाही.
 (१४) शेष पंडित; - हा सर्व शास्त्रज्ञ होता; यानें जयरामकवीस समस्या घातली होती; नांव पूर्व परिचित नाहीं.
 ( १५ ) अनंत शेष पंडित; - हा काशींतील शेष उपनावाचा विद्वान पंडित; शालीवाहनाच्या तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत जेव्हां सर्वत्र यावनी माजली तेव्हा पुणतांबे येथून शेष वगैरे पांच पट्टोच्या विद्वानांची घराणी आपली हजारों पोथ्या पुस्तकें घेऊन श्री क्षेत्रवारणाशी येथें देशत्याग करून गेली, त्यांतील हें शेषाचें घराणे; त्या शेष घरग्यांतील वीरेश्वर शेषापाशीं