पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९० )

इत्तर इसमांची नांवें जयराम कवीने आपल्या चंपूंत दिलेली आहेत. व या शिवाय इतर किरकोळ बालकवी वगैरे दोनचार इसमांचाही त्यांत उल्लेख आहे; व या सर्व मंडळीमध्यें बहुतेक संस्कृत व प्राकृत भाषा जाण- णारे असून कित्येक तर पट्टीचे शास्त्रश व कलामिश होते, असे त्याने दिन- शित केले; त्यावरून इतकी गुणी मंडळी ज्याच्या दरबारी शके१५७५ पासून शके १५८० पर्यंतच्या पांच वर्षांत जयरामानें प्रत्यक्ष पाहिली, त्या शहाजीमहाराजांचे ऐश्वर्य कोणत्या प्रतीचे असावें, याचा सहज अंदाज होण्या- सारखा आहे. शहाजानें देवशेषादि अनेक विद्वानाना वर्षासने करून दिली होतीं, व त्याच्या दरबारी अनेक हिंदु कवी तर होतेच, परंतु अल्लीखान या नांवाचा एक मुसलमान कवीही त्याच्या आश्रयाला होता; त्याप्रमाणेच शहाजी राजा हा स्वतः तर विद्वान् होताच, परंतु संभाजी, व्यंकोजी, रक्षापुत्र कोयाजी वगैरे राजघराण्यातील इतर मंडळीही विद्वान व संकृतज्ञ होती, असे त्यांच्यासंबंधी जयरामानें वर्णन केले आहे. चंपूमध्ये जी एकाइत्तर नोवें जय- राम कवीनें उल्लेखिलीं आहेत ती खाली लिहिल्याप्रमाणे:-

 ( १ ) शिवराम गोस्वामी ( गोसावी ) देशस्थ ब्राह्मण; - हा शहाजीच्या दरबारों, आल्यागेल्याची घन्याला वीं, व गांठ घालून देणारा होता. शिव- राम ( शिवराय ) गोसाव्यासंबंधी पूर्व माहिती नाहीं.
 ( २ ) वीरेश्वर वैद्य;- देशस्थ ब्राह्मण; नांव पूर्वपरिचित नाहीं; शहाजीचा भिषग्वर असावा.
 ( ३ ) मल्लारिभट्ट पुरोहित - हा राजोपाध्याय होता; तो परम बुद्धिवान् व विद्वान् होता; त्यानें जयराम कवीस समस्या घातली होती.
 ( ४ ) नाशेपंडित दिक्षीत, सबंध नांव नारो त्रिमल हणमंते; शहाजांचा विद्वान कारभारी व प्रसिद्ध मुत्सद्दि; लग्नोत्तर जिजाबाईच्या पाठराखणीस हणमंते जाधवरावाकडून शहाजीकडे आले; शहाजी राजाच्या चरित्रांत त्याची हकीकत दिलेली असल्यामुळे येथे द्विरुक्ती केली नाहीं. यानें जयराम कवीस समस्या घातली होती.
 ( ५ ) नरहरि कवीश्वर - देशस्थ ; हे नांव पूर्वपरिचित नाहीं; जयराम कवस समस्या घातली होती. हा शहाजीच्या दरबारी कवी असावा.