पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८६)

कवीनें शहाजीच्या वैभवाचें वर्णन केलेले आहे. तें जयराम कवी शहाजच्या आश्रयाला असल्यामुळे, अतिशयोक्तिचें असेल असे मानले तरी सुद्धा त्या- वरूनही, त्यासंबंध, व इतर अनेक बाबतीसंबंधी पुष्कळच कल्पना करता येते. या चंपूमध्ये शहाजांच्या दिनचर्येचे जे वर्णन केले आहे ते येणेप्रमाणे:-


जामदग्निवत्स; नाशिक जिल्ह्यांतील डिंडोरी तालुक्यांत वणी या गांवाजवळ सप्तशृंगी या नांवाचा एक डोंगर असून त्यावर "सप्तश्रृंगी देवी" हें प्रसिद्ध स्थान आहे. या सप्तश्रृंगीच्या समोरील मार्कंड्याच्या डोंगराखाली या कवीचें गांव होतें; ( गांवाचें नांव कबीने दिलेले नाही. ). आणि मार्कंडेय पर्वतापासून अद्दिवंत पर्वतापर्यंत जे सात किल्ले होते, त्यांची किल्लेदारी जयराम कवींचे वडील गंभारराव यांजकडे होती; आणि अहंमद नगरच्या बहिरी निजाम- शहाच्या राज्याचे पुनरज्जीवन शहाजी हा आपल्या पूर्ववयांत करीत असत या गंभीररावाशों त्याचा सहजच परिचय झालेला होता. पुढे शहाजीने कर्ना- टक प्रांतांत राज्यस्थापना केल्यावर, " बंगळूरच्या शहाजी महाराजाच्या औदार्याची कांत ऐकून, जयराम कवी कर्नाटकांत बंगळूर येथे गेला. ब्रम्ह विद्या निष्णात शिवराय गोस्वामी या नांवाच्या शहाजीच्या दरबारांतील एका विद्वान् मनुष्यास भेटला; व शहाजीची भेट घेण्याचा मापला मनोदय त्यास निवेदन केला. शिवराय वेदांती यानेंती गोष्ट शहाजी राजाच्या कानावर घातली, व राजानें मान्यता दर्शवूत शिवराय वेदांती, व कथा कल्पक वीरे- श्वर वैद्य या उभयतांना कवीस सामोरें पाठवून जयराम कवीस दरबारांत आणविलें. हा जयराम कवी मोठा विद्वान् असून त्याला संस्कृत, प्राकृत गोपाचलीय ऊर्फ ग्वालेरी ऊर्फ व्रज, (ग्वालेरच्या किल्ल्याला गोपाचल, गोपाल- गिरी पूर्वी म्हणत असत.) गुर्जर, वक्तर, ढुंढार, पंजाब, हिंदुस्थान, बागुल, यावनी, दक्षिणात्य यावनी, व कर्नाटक या बारा भाषाचे उत्तम ज्ञान होतें, व तो वरील बाराही भाषेत काव्यरचना करीत असे. त्याची विद्वत्ता पाहून हकीकतीचा तपास करून व हा आपलाच आहे असे म्हणून शहाजीनें त्यास आपल्या आश्रयाला ठेवून घेतले; व रघुनाथपंत हणमंते यांस त्याची यथायोग्य बरदास्त ठेवण्याविषयी आज्ञा केली.