पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८७ )


" पहाटेस ( शहाजी राजाच्या ) शेज घराजवळ बाळसंतोष, कुडबुड्ये जोशी व शाहीर लोक भूपाळ्या वगैरेंचे मधुरालाप काढून राजास सुख. शय्ये वरून उठवीत. इतक्यांत विश्वनाथ भट्ट उच्च स्वरानें प्रातः- स्मरण संस्कृत भाषेत करीत. कित्येक ब्राह्मण पुण्याह वाचनाचें, म्हणजे राजाला सुखाचा दिवस जावो, अशा अर्थाचे मंत्र म्हणत. कित्येक विप्र ॐकारपूर्वक वेदपठण करीत. कित्येक स्वस्ति साम्राज्यादि मंत्रांनी आशी- र्वाद देत; व कित्येक अग्निहोतो वषट्कारार्पणांत गुंतत मंत्रपठणाच्या, भूपाळ्यांच्या व प्रातःस्मरणांच्या ह्या धांदलीत राजा शेजवरून उठून अंगणांत येऊन, आकाशाकडे पाहून अरुंधति, शची, देवसेना व आकाश- गंगा, इत्यादि तारांगणांवर नजर फेंकून, आणि शिव, विष्णु, स्कंद ऊर्फ खंडोबा, ब्रह्मदेव, लोकपाल, इंद्रादि देव, होमशालेतील अग्नि इत्यादींचे दर्शन घेऊन दिशावलोकन करी. ह्याच सुमारास जंगम शंख फुंकीत; गुरव शिंग वाजवीत, व घडशी चौघडा सुरू करीत; ह्या मंगलध्वनींच्या निनादांत तुफान ऐरावत, सवत्स गाय, पुत्रिणी ब्राह्मणी, वर्धमान मानुष, म्हणजे विदूषक, डेंगू ब्राह्मण, व पाण्यांतून नुकताच बाहेर निघालेला डुकर, हे शुभ चिन्हक प्राणी राजापुढून जात. नंतर वाड्याच्या समोरील पटांगणांत हजार पांचशे घोडेस्वार किंवा नाईक कवाईत करीत, त्यांची परेड देहली दरवाजाच्या बाहेर येऊन पाहून, रथ, पालख्या, शिबिका वगैरे वाहनांचे अवलोकन राजा


 जयराम कवी हा शके १५७५ ( इ० सन १६५३ ) पासून शके १५८० (इ० सन १६५८) पर्यंत पांच वर्षे शहाजीच्या आश्रयाला होता. त्यावेळी शहाजीचें वय साठीच्या घरांत आलेले होतें; म्हणजे शहाजीच्या साठपासून पासष्ट पर्यंतच्या पांच वर्षांतीलच तेवढी प्रत्यक्ष पाहिलेली हकीकत जयराम कवीनें चंपूंत दिलेली आहे. शेवटी त्यानें आपल्या मातापितरांस काशीवास घडावा, म्हणून राजापाशीं द्रव्य मागितलें, व तें शहाजीनें त्यास दिले, असा उल्लेख केला आहे, व अखेरीस शहाजी राजासमोर अशी सुंदर पर्दे गाऊन माझ्यासारखे पालखी पदस्थ व्हावें, म्हणून इतर कवींना उपदेश करून जयराम कवीनें परिशिष्ट खंडाची व चंपूची परिसमाप्ति केली आहे.