पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८५ )


तैनातीत ठेविलेली होती; शिवाय शिवाजी हा स्वतःही नेहमीच आपल्या आईची काळजी घेत असे; व प्रत्येक खाजगी, सामाजिक व राजकीय बाब- तींत तो आपल्या आईच्या सल्ल्याने वागत असे, कधी कधी जिजाबाई व शिवाजी हीं उभयतां सोंगट्याही खेळत असत. त्यांच्या पदरी पंताजी गोपी- नाथ बोकील या नांवाचा शहाजीच्या वेळेपासूनचा एक मोठा इभ्रतदार एक- निष्ठ व नांव लौकिकास चढलेला मुत्सद्दा होता. त्याच्यावर जिजाबाईची विशेष मर्जी असून त्यास पंताजी काका असे म्हणत असत व जिजा बाई व शिवाजीबरोबर त्याचा सोंगट्या खेळण्याचा अधिकार असे. याच पंताजीस शिवाजीनें पुढें अफझलखानाकडे आपला वकील म्हणून पाठविले होतें. जिजा- बाई ही पतिनिधनानंतर ( इ० सन १६६४, जानेवारीमध्ये शहाजीचा मृत्यू झाला. ) अजमार्से दहा वर्षे जिवंत होती. ती शिवाजीस राज्या- भिषेक झाल्यानंतर (शके १५९६; जेष्ठ शुद्ध १३; ता० ६ जून इ० सन १६७४) बारा दिवसांनीच ( जन्म इ० सन१५९५ मृत्यू जेष्ठ वद्य ९ शके १५९६; ता० १८ जून इ० सन १६७४) रायगडचे खाली पांचांड येथे मृत्यू' पावली. त्यावेळी तिची खाजगी मिळकत पंचवीस लक्ष दोन अथवा कांहींच्या म्हणण्याप्रमाणे अधीक, " किंमतीची होती, ती मृत्यूसमयीं तिनें शिवाजीस दिली. जिजाबाईच्या मृत्यूमुळे शिवाजीस अत्यंत दुःख झालें, व त्याला आपल्या मृत्यूपर्यंत जिजाबाईची नेहमी आठवण येत राहून तो उदासीन स्थितीत राहिला. मृत्यूसमयीं जिजाबाईचें वय ७९ वर्षांचें होतें.

 शहाजी हा खरोखरीच एक मोठाच वैभवशाली पुरूष होऊन गेला; इतकेच नाहीं तर त्याच्या काळांत, इतका वैभवसंपन्न, व सत्ता आणि अधिकारपूर्ण असा अपवादादाखल तो एकटाच पुरूष उत्पन्न झाला. शहा- जीच्या काळांतील मुसलमानी राज्यांतील मराठा सरदार मंडळींत त्याच्या तोडीचा दुसरा एकही अधिकारी पुरूष निर्माण झाला नाही, किंवा शहाजी- सारखें वैभव एकासही प्राप्त झाले नाही. राधामाघव विलासचंपू+मध्ये जयराम


 + " राधामाधव विलास चंपू " या काव्याच्या कर्त्याचें नांव जयराम, त्याच्या आईचे नांव गंगाबा, बापाचें नांव गंभीरराव, उपनाम पिंड्ये, गोत्र