पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८२ )

भेटला, व आपली सर्व हकीकत तिला निवेदन करून स्वधर्मात परत येण्याची आपली उत्कंठा दर्शविली. निंबाळकरांच्या घराण्याशी भोसल्यांचा पिढीजाद संबंध होता. जगपाळराव निंबाळकराची बहीण दिपाबाई ही मालोजीस दिलेली होती. मालोजी, शहाजी, व शिवाजी या तिघांच्या उत्कर्षास हेच निंबाळकर घराणे कारणीभूत होते; आणि बजाजांसारखा बलिष्ठ सरदार आपल्या पक्षांत असावा म्हणून तिने पुढाकार घेऊन त्याला जातगंगेत पावन केलें; ' तिनें समस्त मराठा मंडळ जमवून, आपत्प्रसंगासुळे नाईकाकडे कांही दोष नाहीं, असे जाणवून शास्त्राधारे त्यांस शुद्ध करून गोतांद घेतलें * आणि शिवाजीची मुलगी नामें सखुबाई हिचा बजाबाचा वडील मुलगा महा- दजी याच्याबरोबर विवाह करून दिला. त्या वेळी शिवाजीने आपल्या जांव- यास मौजे वाल्हे, ता० पुरंदर, प्रांत पुणे या गांवची पाटिलकी इनाम करून दिली; ( इ० सन १६५७ ) व तसे ताकीदपत्र दिले; X त्याच वेळी


x शिवाजीचे ताकीदपत्र खालीलप्रमाणे आहे, तें:-

 " ठाणेदार हजरतखान यांस रा. शिवाजीराजेसाहेब यांची ताकोद, सुमासमान- खमसैन-आलफ (अरबीसन १०५८; ) ची हाना पैलत हुता- षक जमा व बलुते; मौजे वाल्हे प्रांत पुणे, बेदानतके ( म्हणजे कळावें कों, ) मोजें मजकूरची मोकदमी वाल्हेकर करीत असतां, बाळजोशी कुळकर्णी मौजे मजकूर यांस बरवोजी पाटलानें केनी जिवे मारिलें. हा समाचार मशार निल्हे त्रिंबकराव हवलदार, प्रगणे शिरवळ, यांस कळल्यावरून, त्रिंबकराक घावणी करून, बरवोजी पाटील यास धरून नेलें. यास नागवण त्याचा खंड ( दंड ) होन बाराशें केले. या पैक्याचे उगवणीबद्दल म्हाकूजी भापकर मोकदम, मोजे लोणी हा प्रांत, यास जामीन दिले. याउपरी बरवोजी पाटील मौजे मजकूर याच्यानें वैक्याचा वसूल न होय, म्हणून म्हाकूजी भापकरास पाटीलकी बरवोजीनें मौजे वाल्याची दिली. म्हाकूजी पाटीलकी करीत होता तो मयत झाला. त्याचा लेक खंडूजी भापकर पाटिलकी करीत ( असतां ) बरवाजीनें कांहीं कसूर केला म्हणून हरदूजपणे ( उभयतांनांही ) हुजूर बोलावून, अवधी हकीकत मनास आणून, हरदूजणांचें ( उभयतांचं ) समा-