पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८१)

आणि मराठी भाषेत फारशी ऐवज असंख्य संस्कृत शब्दांचा संग्रह होऊन, मराठी भाषा प्रौढ, प्रभावशील व प्रतिभासंपन्न बनली.

 शहाजीच्या चरित्रांत मातुःश्री जिजाबाई हिच्या संबंधानेही त्रोटक उल्लेख करणे आवश्यक आहे. जिजाबाई ही अत्यंत मानी, कर्तबगार व मोठ्या धीराची व खोल अकलेची स्त्री होती; आपल्या माहेरी सुखोत राहण्या- पेक्षा आपल्या सत्तेच्या जहागिरीत कष्टांत राहणे तिनें पसंत केलें होतें. शिवाजी तिचा प्राणविसावा होता. जिजाबाई है शिवाजीचे आद्य दैवत होतें. आपल्या मातेचे कर्तृत्व शिवाजी जाणून होता. शिवाजी आपल्या कुळाचें नांव काढील, असे जिजाबाईस वाटत होतें. "शत्रूचे पारिपत्य करून कुळाचा उद्धार करणारा शककर्ता आपले कुळांत निपजणार आहे, म्हणून देवांचे दृष्टांत झाले आहेत; परंतु ते केव्हां खरे होतील कोण जाणे ! " असे दुःखोद्गार ती वारंवार शिवाजीजवळ काढीत होती. महाभारत व रामायणां- तील अवतार कृत्यें, युद्धाची वर्णनें, व पराक्रमाच्या गोष्टी वारंवार ऐकून व त्यांचे मनन करून " आपणास ईश्वराने कांहीं विशिष्ट महत्कृत्य तडीस नेण्याकरितांच निर्माण केले आहे, "अशी शिवाजीची भावना होत चालली होती. जिजाबाई ही मोठी व्यवहारचतुर असून तिला लिहितांवाचताही येत असे. तिनें स्वतः दादोजी कोंडदेवाच्या मदतीनें पुणे येथील जहागिरीचा कारभार चालविला होता; अनेक तंट्याचे निवाडे दिले होते, व अनेक लोकांना सनदा व उत्पनेंही तिनें करून दिली होती. त्याप्रमाणेच पुढील काळांत शिवाजीच्या गैरहजरीत ती राज्याचा कारभार पहात असे, व राजकारणी हुकूम सोडून न्यायमनसुब्याचे कामही ती करीत असे, व व तिनें दिलेले हुकूम, महजर व निवाडापत्रे हल्ली उपलब्ध आहेत. त्या- प्रमाणेच समाजसुधारणेच्या बाबतीतही तो प्रमुख होती. बजाजी नाईक निंबाळ- कर यानें मुसलमानी धर्म स्वीकारून आदिलशहाच्या मुलीशीं लम करून तो कांहीं काळ विजापूर येथे राहिल्यानंतर परत फलटण येथे आला. त्यानंतर त्यास मुसलमान झाल्याबद्दल खेद वाटू लागला; व स्वकीयाश व्यवहार बंद झाल्यामुळे त्यास फारच अडचण भासूं लागली. तेव्हां बजाजी शिंगणापूर येथे जाऊन श्रीशंभूमहादेवाचे दर्शन घेऊन जिजाबाईस येऊन