पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८३ )

शिंगणापूरच्या बडव्यासही दोनशे रुपयांचें इनाम देण्यांत आले; ते आज तागायत त्यांच्या वंशजाकडे चालू आहे.

 माता जिजाबाई ही लोकांचा स्वकीयांचा परामर्ष घेण्यांत अतीशय दक्ष असे. सिलीमकर विठोजी हैबतराव देशमूख याची कन्या खंडेराव गोमाजी नाईक पानसंबळ याच्या मुलास देण्याचे ठरले; त्या वेळी जिजाबाईने विठोजी देश- मुखास खालीलप्रमाणे पत्र पाठविले; ( राजवाडे, खंड १७ लेखांक १६ )


धान करून पाटीलकीची किंमत होन १२०० पैकीं हुजुरानें हरदूजणाश वाटून दिले होन बाराशें, बितपशील:-
९०० खंडूजी बिन म्हाकूजी भापकर होन.
३०० बरवोजी वाल्हेकर घोडा १ एकूण होन.

 येणेंप्रमाणे पैकों ( वांटणीनें) देऊन पाटिलकी विकत घेऊन, राजश्री महा- दजी निंबाळकर, आमचे जांवई यांस मौजे मजकूरची पाटिलकी करतील. तुम्हीं त्यास राजी होऊन असणे. तालीक ( नक्कल ) लेहून घेऊन, अस्सल नाईक (महादजी ) मशार निल्दे यांस फिरून देणे. शके १५७९ ( इ. सन १६५७ ) हेमलंबी नाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध १ मोर्तब सूद.

 विशेष खुलासा:- सखूबाई ही शिवाजीचे पहिले कुटुंब सईबाई हिची मुलगी, व संभाजीची बहीण होती. महादजी निंबाळकर ( शिवाजांचा जांवई) हा शिवाजीच्या सैन्यांत एक प्रमुख सरदार असून संभाजसही त्याने पुष्कळ मदत केली होती. संभाजीच्या वधानंतर अवरंगजेबानें महादजी व सखुबाई यांस पकडून ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत प्रतिबंधांत ठेविले; व त्याच ठिकाण पुढे त्यांचा अंत झाला.

 शिवाजीचा प्रसिद्ध सरनोबत नेताजी पालकर हाही असाच बाटून मुसल- मान झाला होता; व उत्तर हिंदुस्थानांत असतो त्यानें मुर्शिदकुलीखान हें नांव धारण केलें होतें. पुढें तो दक्षिणत परत येऊन मातोश्री जिजाबाईस भेटला; तेव्हां तिनें कन्हाड क्षेत्रांतील ब्राह्मणांकडून त्यास शुद्ध करवून पून्हां जातींत घेतले. या दोन उदाहरणावरूनच जिजाबाईची अलौकिक योग्यता व दूरदृष्टी निदर्शनास येते.