पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८०)

त्याच्यावर व त्याच्या मुलांवर त्याबद्दल सूड उगवील असे शिवाजीस वाटलें, म्हणून त्याने पुढे व्यंकोजीशों तह केला, तेव्हां त्यांत " अरणो प्रांत वेदो भास्कर व त्याचे आठ मुलगे यांजकडे चालवावा, त्यांस कोणत्याही प्रकारें तोसीस लावूं नये; " असे एक कलम घातले. त्या काळापासून ही अरणी येथील जहागीर अस्तित्वांत असून वेदो भास्करचें घराणे आजतागायत तिचा सुखानें उपभोग घेत आहे.

 भोंसल्यांचे घराणे अत्यंत धर्मनिष्ठ म्हणून पूर्वीपासूनच नांवाजलेले असून शहाजी हाही मालोजीप्रमाणेच धर्मनिष्ठ होता, व प्रसिद्ध आनंदतनय हा शहाजी भोसले याचा गुरू होता असे कळते. या आनंदतनयाचें मूळ नांव गोपाळराव हैं असून त्याच्या बापाचें नांव आनंदराव हैं होतें. तो जातीचा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून तो अरणी येथोल राह- णारा होता. तो महान् शिवोपासक असून, कवी व योद्धा होता. प्रसिद्ध " नलदमयंती स्वयंवराख्यान " या काव्याचा कर्ता रघुनाथ पंडित (शिवा- जांचा राजव्यवहार कोश " करणारा रघुनाथ पंडित तो हा नव्हे. ) हा आनंदतनयाचा व्याही होता. आनंदतनय हा आपला गुरू मुरार पर ब्रह्म याच्या प्रमाणेच महान् ईश्वरभक्त होता. भागवत, रामायण, वगैरे ग्रंथां तून आनंदतनयानें मराठीत पुष्कळ कविता केलेल्या असून, जरी त्यांत अरबी व फारशी शब्दाचा पुष्कळ भरणा आहे तरी, त्या मोठ्या सुरस व सुबोध आहेत; शिवाय तो मोठा शूर असून अरणी येथील युद्धांत याने मोठा पराक्रम गाजविला, अशी माहिती उपलब्ध आहे. शहाजीच्या काळापर्यंत महाराष्ट्र भाषा दैन्यावस्थेत होती; शहाजीचा गुरू हा आनंदतनय यानें मराठी भाषेत अक्षरगण वृत्तांची योजना अगदीच नव्यानें प्रथम सुरू केली. त्या प्रमाणेच शहाजी कर्नाटकांत गेल्यावर जमीनीचें कौलपट्टे मराठी भाषे मध्ये लिहिण्याचा त्यानें नव्यानें प्रथम प्रघात घातला; व अशा रीतीनें शहा- जीनें अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे मराठी भाषेच्या उन्नतींच्या बाबतीतही महाराष्ट्राला ऋणी केले. त्यानंतर पुढील काळांत, शिवाजीनें स्वराज्याची स्थापना केल्या- नंतर हरएक बाबतीत स्वकीय देशी बाणा प्रचारांत आला; राजव्यवहार कोश निर्माण झाला; संस्कृत भाषेचें मोठ्या झपाट्याने पुनरुज्जीवन झालें: