पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७८)


छत्रीस इनाम करून दिले; आणि पुढे पंघरा वर्षांनी म्हणजे इ० सन १६७९मध्ये शिवाजी व त्याचा सावत्र भाऊ व्यंकोजी या उभयतीमध्ये तह झाला, त्या वेळी शहाजीराजे यांच्या छत्तीची नेमणूक व्यंकोजीने उत्तम प्रकारें चालवावी, अशाबद्दल शिवाजीनें व्यंकोजीस मुद्दाम बजाविलें; व त्याच्या बरोबरील तहांत " महाराजांचे ( शहाजीराजे याचे ) छत्रीकडे नेमणूक दर- माही चौघडघासुद्धा तुम्हीं ठेवावी; घोडा, हत्ती, कारकून असावे; येविशी ढील होऊं नये; " असे एक स्पष्ट कलम (कलम १८) घातलेलें आहे. शिवाजीनें केलेल्या त्या व्यवस्थेप्रमाणे शहाजीराजे याच्या ह्या छत्रीसन्निध- ह्या वीर पुरुषाच्या आत्म्याच्या शांतत्रनाकरितां व सन्मानाकरितां-पुष्कळ वर्षे नंदादीप जळत असत; परंतु आतो तर ही छत्री अगदीच मोडकळीस आलेली असून तिचे अवशेषच मात्र हल्ली काय ते अस्तित्वांत राहिले आहेत.

 शिवाजीनें शिखर शिंगणापूर येथेंही शहाजी राजाची एक मोठी डौलदार छत्री बांधविली. " शिखर शिंगणापुरास छत्रीची पूजाअर्चा भोंसल्यांचे कर्मों तेथें अद्याप करितात. शिखर शिंगणापुरावर भोसल्यांची फार भक्ती असे, आणि भक्ती बसण्यासारखेच तें स्थान आहे. तेथून पूर्वेस नगरापासून सोला- पुरापर्यंतचा सर्व बालेघाट दिसतो; दक्षिणेस मिरजेपर्यंतचा टापू नेत्रकक्षेत येतो; पश्चिमेस पन्हाळ्यापासून रायरी, सिंहगडपर्यंतचा डोंगराळ प्रदेश कनी- निकेवर प्रतिबिंबित होतो; आणि उत्तरेस फलटण, बारामती, पाटस, खेड, व जुन्नर, या तालुक्यांची मखमल पृथ्वीवर इंतरलेली दृष्टिपथांत भरते. अर्से हैं महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाण राष्ट्राच्या पितरांचें शेवटचें विश्रांति- स्थग्न होण्यास सर्वथैव लायक आहे; " आणि महाराष्ट्रधर्मसंस्थापक, व गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस, राष्ट्रपुरुष छत्रपति शिवाजीमहाराज


शहाजी राजाच्या छत्रीच्या खर्चाकरितां दिला होता, परंतु " शिवाजीनें तेथील वसूल गोळा करून तो छत्रीची पूजाअर्चा व इतर व्यवस्था, यांत खर्च करावा, पण त्या गांवावर विजापूरकरांचा ताबा व हुकमत असावी " अशा अटीवर आदिलशहानें तो छत्रीस इनाम दिला होता.