पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७७)

रणभूमीवर शत्रू सैन्याशी झगडतांना, शेंकडों युद्धांत हजारों मानवी जीवांचा संहार उडविण्याच्या संबईनें ज्याचें अंतःकरण वज्राहून कठीण झालेलें, तोच शिवाजी मोहवश होऊन ह्या प्रसंगी दिङ्मूढ बनला | शिवाजीनें जिजाबाईच घट्ट पाय घरून दुःखाने तिची नानाप्रकारें समजूत केली. दीनवाणीनें मोठाच आकांत आरंभिला; परंतु ती साध्वी ऐकेना. यावेळी मोरोपंत पिंगळे, निराजीपंत, दत्ताजीपंत वगैरे कारभारी मंडळी सन्निध होतो; त्यांनीही मातुःश्रीस विनंती केली कीं, " आपण अग्निप्रवेश केल्यास महाराज प्राण ठेवणार नाहीत; त्यामुळे बहुत कष्टानें संपादन केलेले राज्य आजच नष्ट होण्याचा प्रसंग येईल; व शिवाजी महाराज व थोरले महाराज यांचे नांवही मागें राहणार नाहीं. तरी ह्या गोष्टीकडे नजर देऊन महाराजास ( शिवाजीस ) ओसंगी ध्यावें. मन घट्ट करून राहावें. ( आपण ) हेका धरून सती गेला तर वंशक्षय केला, ही अपकीर्ती जगांत होईल. " शिवाजीनेंही "तिचे मांडीवर बसून गळां मिठी घालून, आण घालून राहविली. " "आपला पुरुषार्थ पाहावयास कोणी नाही; तूं जाऊं नको" असे म्हणून मोठा यत्न करून राजियांनी ( शिवाजीनें ) व सर्व थोर थोर लोकांनी राइविली; " व सर्वांच्या आग्रहावरून जिजाबाईनें आपला सती जाण्याचा बेत रहित केला.

 शिवाजीस शहाजीची निधनवार्ता कळल्यावर त्यानेही सांप्रदायाप्रमाणे सिंहगड येथे वडिलांची उत्तरक्रिया केली; प्रीति श्राद्धादि विधि यथासांग करून लक्षभोजने घातलीं; पुष्कळ दानघर्म केला. शहाजी बेदनूर प्रांतीं बेदि- करें ऊर्फ बासवापट्टण जवळ तुंगभद्रेच्या कांठी अरण्यांत घोड्यावरून पडून मृत्यु पावला; त्या ठिकाणी शिवाजीनें, पुष्कळ संपत्ति खर्च करून आपल्या वडिलांची छत्री बांधली; तेथे पुष्कळ दानधर्म केला; या छत्रीच्या पूजेसाठीं शिवाजीनें यरगटनहळ्ळी* हें गांव विजापूरकरांकडून मागून घेऊन तें


 *यरगटन हळ्ळी हे खेडेगांव बेदिकरें या गांवाजवळच तुंगभद्रा नदीच्या कांठी आहे. शहाजी राजा शिकारीस गेला त्या वेळी त्याचा व त्याच्या सैन्याचा तळ यरगटनहळ्ळी येथें होता. हा गांव अदिलशहानें शिवाजीच्या मागणीप्रमाणे
१२