पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७१)

व्यंकोजी यांना नाना प्रकारच्या मौल्यवान वस्तु अर्पण केल्या; शहाजीचा कार भारी त्रिंबक नारायण हणमंते यांस उंची पोषाख ब जवाहीर देऊन ढाल. तरवार बक्षीस दिली; राजाच्या परिवारांतील इतर सर्व मंडळींना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणें, जवाहीर, पोषाख, व वस्त्रे वगैरे दिली. आणि शहाजी- बरोबर जवाहीर, हत्ती, घोडे, वाटखचीस भरपूर खजीना व सरंजाम देऊन त्याची कर्नाटक प्रांत रवानगी करून दिली. यावेळी शहाजीचे वय ६८ वर्षांचे होतें; म्हणून शिवाजीनें त्याच्याबरोबरील मंडळीस पुन्हा पुन्ही “थोरले महाराज वयोवृद्ध झाले आहेत; त्यांची अतीशय काळजी घ्या;त्यांच्या जिवास अतीशय जपा;" असे आग्रहानें बजाविलें. हा वियोगाचा प्रसंग मोठाच दुःखदायक होता. शहाजी वयोवृद्ध असल्यामुळे तर तो परमावधी- चाच दुःखदायक होता; आणि आतां पुन्हां आपली सर्वांची भेट होते की नाहीं, अशी शंका येऊन, शहाजी, जिजाबाई व शिवाजी यांना वियोगजन्य दुःखाचा उमाळा येणे स्वाभाविक होतें. त्यामुळे सर्वांनाच परमावघोचें दुःख झालें; सर्वांनी अश्रुपूर्णनत्रांनी एकमेकांचे निरोप घेतले, आणि हाच वियोग पुढे लवकरच ( इ० सन १६६४मध्यें ) कायमचा होऊन मातुश्री जिजा- बाईस-फत शिवाजीच्या आग्रहाच्या पायधरणीमुळेच अग्निप्रवेश करण्याचा बेत तहकूब करून-वैधव्याचें खडतर दुःख भोगीत आयुष्य कंठण्याचा, आणि शिवाजीस पितृहीन होण्याचा दुःखद प्रसंग ओढवला.

 शहाजी सहा महिने दक्षिण प्रांती राहून कर्नाटक प्रांतांत जाण्यास निघा- ल्यानंतर, पहिल्याने विजापूर येथे जाऊन अली अदिलशहास भेटला; व इतः पर शिवाजीकडून विजापूरच्या प्रदेशास कोणत्याही प्रकारें उपद्रव होणार नाहीं अशी त्याची पुन्हां खातरजमा केली. उलटपक्षी शहाजीनें मध्यस्थी करून शिवाजीश तह घडवून आणल्याबद्दल शाहानेही त्याचा योग्य प्रकारें गौरव केला. नंतर शाहाचा व सर्व दरबारी मंडळींचा निरोप घेऊन शहाजी कर्नाटक प्रांत परत गेला; व तिकडील प्रांताचा बंदोबस्त करण्याच्या उद्यो- गास त्याने पुन्हां लागलीच सुरवात केली.

 शिवाजी व शहाजी या उभयतांची भेट झाली, त्या वेळी शहाजीनें शिवाजीस, " आपल्या पाश्चात् तुम्ही व्यंकोजीचें योग्यप्रकारें पालन करावें;"