पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७० )

बर घेऊन, त्यास, आपल्या नूतन संपादित राज्यांतील राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, लोहगड, प्रतापगड, व रायरी ( रायगड ) वगैरे आपल्या ताब्यांतील किल्ले व तेथील व्यवस्था दाखविली; व त्या वेळेपर्यंत केलेल्या अनेक राजकारणांची सर्व हकीकत त्यास निवेदन केली. शहाजी हा मोठा अनुभवो, पटाईत सेनानी, व युद्धशास्त्रविशारद असल्यानें त्याने हे सर्व किल्ले पाहिल्यावर, रायरी हाच किल्ला सर्वांत बळकट, कुबल कठीण, संर- क्षणास व आश्रयास उत्तम, व राजधानीस योग्य, अशी त्याची खात्री झाली; तेव्हा त्यानें “तुम्ही राजगड येथील आपली राजधानी बदलून रायरी है राजधानीचें ठिकाण करावें;" अशी त्यानें शिवाजीस आज्ञा केली; आणि शिवाजीची तशीच खात्री होऊन त्याने ती गोष्ट मान्य केली. त्या किल्ल्याचे रायरी हें नांव बदलून "रायगड" हे नांव ठेविलें, व ह्या वर्षापासूनच ( इ० सन १६६२ ) रायगड ही शिवाजीची राजधानी झाली.

 नंतर ही सर्व मंडळी रामदासस्वामींचें दर्शन घेऊन पन्हाळगडावर आली. शिवाजीचे किल्ले, कोट, ठाण, जागा, राजधानी, अठरा कारखाने, शिबंदी, फौज, हत्ती, घोडे, तोफा, वगैरे जंगी सरंजाम पाहून शहाजीराजे परम संतुष्ट झाले; शहाजीस अत्यंत आनंद झाला; आणि "तुझ्या अलौकिक पराक्रमानें व कर्तृत्वानें मो संतुष्ट झालों;" असे म्हणून शहाजीनें आपली "तुळजा " नांवाची प्रासादिक तरवार शिवाजीस बहाल केली; व वडिलांची देणगी म्हणून मोठ्या पूज्यबुद्धानें शिवाजीने ती भवानी तरवारीजवळ नित्य पूजेस ठेविली. पन्हाळगडी आल्यावर, शहाजीनें कर्नाटकप्रांती परत जाण्याचा आपला मानस शिवाजीस कळविला; तेव्हां शिवाजीस अतीशय वाईट वाटले. आपल्या वडिलांनी सन्निध राहून राज्याचा कारभार पाहावा अशी शिवाजीची इच्छा होती; आग्रह होता; परंतु "मी इकडे राहिल्यास अत्यंत कष्टानें कर्नाटकांत संपादन केलेली दौलत नाहींशी होईल, आणि मी कर्नाटक प्रांतीं राहिलों तरच मला तुमच्या अंगिकृत कार्यास अनेक प्रकारें पुष्कळच साह्य करता येईल " असे शहाजीनें शिवाजीस सांगितले. तेव्हां आपला आग्रह सोडून शिवाजी शहाजीची रवानगी करण्याच्या तयारीस लागला. त्यावेळी शहाजांच्या सन्मानार्थ शिवाजीनें पुन्हां एक मोठा समारंभ केला. शहाजी, तुकाबाई व