पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७२)


अशी आज्ञा केली होती, असे दिसतें. कारण, शिवदिग्विजयांत लिहिल्या- प्रमाणें, शहाजी तंजावर येथे “ परत गेल्यावर व्यंकोजीस बोलावून त्यानें आज्ञा केली की, "शिवाजीनें जवांमदीनें नवें राज्य मेळविले आहे. तुम्ही आमची दौलत संपादिलो आहे; यांत विठोजीराजे आमचे काका, यांचें कुटुंबाचें,व शरीफजी राजे आमचे भाऊ,यांचे वंशाचें वंशाचें तुम्ही वडलिपणें चालवावें, आणि प्रजापालन करून राज्य करावें. वडील शिवाजीराजे यांनी सर्वांचे संगोपन करून चालवावें, तरी त्यांनी पृथ्वी आक्रमण करण्याचा इरादा धरिला. तेव्हां ईश्वरकृपें करून त्यांचे मनोरथ पूर्ण झाले असतां, सर्वोचें संगोपन करावयास अधिकारीच आहेत; करतील. कदाचित् त्यांजवरी समय गुदरला तरी आम्ही पादशहापासून इतल्ला तोडून दौलतीचा बचाव करून घेतला आहे. ही दौलत तुम्हां उभयतांची. परंतु दौलत रक्षावयाकरितां तुम्हीं वडीलपणे सांभाळ करावा. मुख्यार्थ आमचे कुळी आम्ही आमचे कुटुंबांत शिवाजीराजे जेष्ठ; त्यांचे ठायीं तुम्हीं; त्यास राजघर्म प्रवाहें तुम्हीं वडीलपणे कुटुंबी यांचा सांभाळ करणे; पराक्रमी शिवाजीराजांचे तुम्ही भाऊ; आमचे चिरंजीव; त्यांहून आवडते विशेष आहां; तरी सर्वांपासून चांगले म्हणून घ्गल, पदरीं वडिलोपार्जित दोनचार माणसे आहेत, त्यांचे विचारें तुम्हीं चालल्यास तुमचें कल्याण आहे." असा शहा- जीनें व्यंकोजीस उपदेश केला. हा उपदेश अत्यंत महत्वाचा व मौल्यवान आहे; आपणांस वैभव प्राप्त झाले असतां, अनुकूल स्थितीत आप्त स्वकीय व सहवासांतील इतर मंडळी यांचा कसा प्रतिपाळ करावा, हें या उपदेशांत दिग्दर्शित केले आहे; आणि प्रत्येक कर्त्या संसारी मनुष्यानेंही तो ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे.

 शिवाजीची व नंतर आदिलशाहाची भेट घेऊन इ. सन १६६२ मध्ये शहाजी कर्नाटक प्रांतों परत जातो न जातो ताँच बेदनूरकर भद्रापा नाईक यानें तिकडे मोठाच पुंडावा आरंभिल्याची बातमी त्यास समजली. या भद्राप्पा नाइकाचे मूळ नांव शिवाप्पा नाईक हे असून, त्याच्या घराण्याचा संस्थापक भद्राय्या ऊर्फ भद्राप्पा नाईक यांच्या नांवावरून फारशी तवारि- खांत, त्याचा उल्लेख मद्राप्पा नाईक या नावाने केलेला आहे. त्याला