पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६९ )


उत्तरेस कल्याणपासून दक्षिणेस फोंड्यापर्यंत आणि पश्चिमेस दाभोळपासून पूर्वेस इंदापूरपर्यंचा सर्व प्रदेश शिवाजीच्या ताब्यांत राहावा. (३) शिवाजी हा आपला मांडलीक आहे, असे विजापूर दरबारने या पुढे न म्हणतां, " शिवाजी हा स्वतंत्र राज्यकर्ता आहे " असे मान्य करावें; त्या नात्यानें त्याच्याशी यापुढे व्यवहार ठेवावा; व दरसाल सात लक्ष होन रोकड पेषकष ( खंडणी ) अदिलशहानें शिवाजीस द्यावी. ( ४ ) परस्परांनी एक मेकांना प्रसंग पडेल त्या त्या वेळी मदत करावी. (५) विजापूरचा वकील शिवाजीच्या दरबारी नसावा. (६) शिवाजीतर्फे अदिलशाही दरबारांत एक चकील राहावा. ( ७) शामजी नाईक पुंडे याची, वकील म्हणून त्या दर- बारी नेमणूक करण्यांत आली आहे; त्याप्रमाणे विजापूर येथे दरबारांत राहून, त्या दरबारच्या व शिवाजीच्या म्हणजे दोघांकडीलही कामाची त्याने विल्हे- वाट करीत जावी. हा तद्द, शहाजीमार्फत झाला म्हणूनच विजापूर दर- बारास तो बराच फायदेशीर असा झाला; व तो त्या दरबारानें लागलाच मान्य केला. याच वेळी, "आम्ही जिवंत आहों तोपर्यंत तुम्ही इतःपर विजापूरकरांशी झगडूं नये, अशी शहाजीनें शिवाजीला शपथ घातली; व ती मान्य करून त्याप्रमाणे वागण्याचें शिवाजीनें मान्य केले. ही हकीकतही शहाजीनें अदिलशाहास कळवून, व पुढे शाहाची भेट झाल्यावर त्यास समक्ष सांगून त्याबद्दल त्याची खातरजमा केली. शिवाजीचाही या तहानें, त्याचें स्वातंत्र्य जाहीर होऊन, पुष्कळच फायदा, व त्याचें सर्व श्रेय आपल्या वडिलानांच आहे, हे जाणून शिवाजीस शहाजीराजाबद्दल अतीशयच धन्यता वाटली.

 शहाजीने आपणाबरोबरील सर्व मंडळीसह पुणे येथे पावसाळाभर मुक्काम केला; या अवधीत शिवाजीनें शहाजीची उत्कृष्ट प्रकारें बरदास्त ठेविली; आपली सावत्र आई तुकाबाई हिला अतीशय आदरानें व सन्मानानें वाग- विलें; सावत्र बंधू व्यंकोजी यांसही अतीशय प्रेमानें वागवून शहाजीबरो- बरील सर्व मंडळींचा उत्तम परामर्ष घेतला; शहाजीस आपली सर्व संपत्ति दाखविली; शहाजी तेथें होता तोपर्यंत त्याच्या विचारानें व नांवाने राज्य- कारभार चालविला; पावसाळा संपल्यानंतर शिवाजीने शहाजीस आपणाबरो-