पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६८)

यांस ) असा दृष्टांत झाला होता की, तुमच्या कुलांत शककर्ता निर्माण होऊन तो हिंदु प्रजेचें व हिंदुधर्माचें यवनापासून रक्षण करील. हा दृष्टांत खरा होता, हे तुम्ही आपल्या अलौकिक कर्तृत्वाने ( आमच्या ) प्रत्ययास आणून दिले. तुमच्या ठायींच्या शौर्यवीर्यादि अनुपम गुणांच्या योगाने आमच्या कुलाचा पुनरपि भाग्योदय झाला आहे. असा प्रतापशाली पुत्र आमच्या उदरी निर्माण झाला, म्हणून आम्ही त्रैलोक्यांत धन्य झालों आहो." शहाजीच्या ह्या अत्यंत प्रेमाच्या व हृदयस्यर्थी भाषणानें शिवाजी सद्गदित झाला; त्यानें पुन्हा वडिलांच्या चरणी मस्तक ठेविलें; आणि मोठ्या नम्रपणानें म्हटले की, " मजकडून जे कांहीं यत्किचित् झाले आहे, ते सर्व आपल्याच पुण्याईनें घडून आलें; आणि मला आपला आशीर्वाद होता, म्हणूनच मी माझ्या अंगीकृत कार्यात अल्प प्रमाणांत यशस्वी झालों आहे." अशारीतीनें पितापुत्राच्या भेटीचा समारंभ झाल्यानंतर, शिवाजीने आपल्या सर्व सरदार व कारभारी मंडळींच्या शहाजीर्शी भेटी करविल्या. शिवाजीनें आपली सापत्न माता तुकाबाई हिलाही जिजाबाईप्रमाणेच योग्य सन्मान दिला; योग्य आदर दाखवून दर्शन घेतलें; सापत्न बंधू व्यंकोजी यांसही, मनांत कोणताही दुजा भाव न ठेवतो, प्रेमानें आलिंगन दिलें. नंतर शहाजी राजाबरोबरील सरदार कारमान्यांच्या भेटी घेऊन त्यांचीही मोठ्या प्रेमानें विचारपूस केली. शिवाजीनें ह्या प्रसंगी मोठा आनंदोत्सव केला; पुष्कळ दान- धर्म केला. ब्राह्मणभोजने घातली; गोरगरिबांस पुष्कळ खैरात वाटली; व नंतर ह्या सर्व मंडळीसह शिवाजी पुणे येथे येऊन मुक्कामास राहिला. त्यानंतर शिवाजी आणि विजापूरकर यांच्यामध्यें शहाजीमार्फत एक तह झाला. X ( इ० सन १६६२ ) त्यांत खालील कलमें ठरली तीं:- ( १ ) विजापूर दरबारने शिवाजीच्या सर्व मागण्या कबूल कराव्या. ( २ )


 x हा तह शहाजी कर्नाटक प्रांत असतां त्याच्यामार्फत, अल्ला अदिल शहा यानें आपला वजीर अब्दुल महंमद यांच्या सल्लयानें गुप्तपणें केला, व नंतर अदिलशहाची परवानगी घेऊन शहाजी दक्षिण प्रांती आला, असाही कांहीं ठिकाण उल्लेख आढळतो.