पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६७)

राजे याच्यासह आघींच देवालयांत जाऊन शहाजीमहाराजांची मार्गप्रतीक्षा करीत बसली होती. भेटीस चोवीस + वर्षे होऊन गेलेलीं, सबब शास्त्र विधीनें भेट घेणें प्राप्त झालें. शहाजीराजे देवालयांत येतांच राजोपाध्ये यांणीं श्रीची यथासांग पूजा करवून सघृत अशा काशाच्या ताटांत, स्त्री, पुत्र, स्नुषा व पौत्र यांची मुर्खे शहाजीमहाराजाकरवी एकसमयावच्छेदे करून अवलोकन कर विलीं; व नंतर परस्पर भेटी झाल्या. शिवाजीनें शहाजीराजांच्या चरणी मस्तक ठेविलें; राजांनी त्यास हातांनी उचलून आलिंगन दिले; उभयतांच्याही नेत्रांत प्रेमाश्रू निघाले; नंतर शहाजी राजास पालखीत बसवून, पालखीची तबकडी धरून मोठ्या मर्यादेनें अनवाणी चालून, शिवाजीनें राजास त्यांच्या डेन्यांत पोहोंचविलें; नंतर राजे बिछायतीवर बसल्यावर शिवाजीनें त्यास नम्रपणाने अशी विनंती केली कॉ, " मी विजापूरकराश वैर केल्यामुळेच आपणांवर प्राणसंकट ओढवले; हा मजकडून मोठाच अपराध घडला; त्याबद्दल मला वडिलांनी योग्य वाटेल ती शिक्षा करावी; " शिवाजीचें हें भाषण ऐकून शहाजीराजे सद्गदित झाले. त्यांनी मोठ्या प्रेमानें व आग्रहाने शिवाजीस आप णाजवळून बसवून घेऊन त्यास ते म्हणाले, “ तुम्ही शिसोदें क्षत्रीय कुलांत निर्माण होऊन त्या कुलास अनुरूप असा अलौकिक पराक्रम केला, व हिंदु प्रजेस यवनांच्या क्लेशप्रद सत्तेंतून स्वराज्य स्थापन व स्वराज्य रक्षण कर •ण्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांत यशस्वी झाला, हे पाहून मला परा- काष्ठेचें] समाधान व घन्यता वाटत आहे. आमच्या वडिलांस ( मालोजी राजे


 +माता, पिता, पती, पत्नी, भगिनी, बंधू, पुत्र, कन्या, स्नुषा व पौत्र, त्यापैकी कोणाच्याही भेटीस पूर्ण बारा वर्षे, व त्याहून अधिक काळ लोटला असल्यास पुढे केव्हांही त्यांची भेट व्हावयाची असल्यास ती देवालयांतच उपाध्याकडून श्रीची पूजा यथासांग करवून पहिल्यानें व्हावी, व ज्याची भेट व्हावयाची, त्याचें भेट घेणारानें प्रत्यक्ष मुखावलोकन न करता त्याचें मुख पहिल्यानें पाण्यानें, तेलानें किंवा तुपाने भरलेल्या काशपात्रात प्रतिबिंब रूपानें पाहावें, व तसे पाहिल्यानंतरच प्रत्यक्ष भेट व्हावी, असा शास्त्रविधी आहे; त्यास अनुसरून ही अशी विधिपूर्वक भेट घेण्यांत आली होती.