पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६६)

तेथून पंढरपूर येथे येऊन तेथील श्रीविठोबाचें दर्शन घेतले. नंतर शिखर शिंगणापूर येथे येऊन श्रीशंभू महादेवाचें, व आपले वडॉल मालोजी राजे यांच्या छत्रीचें दर्शन घेतले व शिखर उतरून आपले संबंधी जे फलटणचे निंबाळकर त्यांची भेट घेऊन, शिवाजीची भेट घेण्यासाठी तो पुणे प्रांती येण्यास निघाला. शहाजीने आपल्या ह्या एकंदर प्रवासांत प्रत्येक देवस्थानी पुष्कळ दानधर्म केला, ब्राह्मणभोजने घातली व गोरगरिबांस पुष्कळ खैरात वाटली. शिवाजीनें ब्राह्मणांच्या विचाराने आपल्या वडीलांची भेट जेजुरी येथे घेण्याचें ठरवून त्यांच्या स्वागताची उत्कृष्ट तयारी केली. शिवा- जोस घटकोघटकी शहाजीच्या आगमनाची बातमी होतीच; त्यामुळे शहाजी राजे जवळ आले असें ऐकून शिवाजीनें आपली फौज, हत्ती, घोडेस्वार, मुत्सद्दी व कारकून मंडळा वगैरे बरोबर देऊन सरनोबत योस, त्यांस घेण्या करितां सामोरें पाठविलें. पेशवे, मोरोपंत पिंगळे यांस पुढे पाठवून मुहूर्त ठरवून जेजूरी येथे श्रीखंडोबाच्या देवालयांत भेटीची योजना निश्चित कर ण्यांत आली; व शहाजीस मोठ्या समारंभानें वाजतगाजत श्रीच्या देवालयांत आणून उतरविण्यांत आले. शिवाजीराजे सौभाग्यादि संपन्न वज्रचुडेमंडित जिजाई आऊसाहेब, पुतळाबाई आदिकरून खाशीमंडळी बालयुवराज संभाजी


 *या वेळीं ( इ० सन १६६२) बाल युवराज संभाजीराजे याची माता, व शिवाजीमहाराजाची वडील पत्नी सईबाई ही जिवंत असून, तो जेजूरी येथे ह्या भेटीच्या वेळी हजर होती, असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आढळतो; पण तो बरोबर नाहीं. संभाजीचा जन्म इ० सन १६५७च्या जून महिन्यांत ( ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५७९ ) झाला; व अफझल- खानाबरोबरील युद्धप्रसंगाच्या काळांतच, शिवाजीचा मुक्काम प्रतापगडाखालीं असतां, इ० सन १६५९च्या सप्तंबर महिन्यांत ( भाद्रपद वद्य चतुर्थी, शके १५८१; सर्वपितरी अमावास्येच्या आदले दिवशों ) मृत्यू पावली; अर्थात् ह्या भेटीच्या प्रसंगी सईबाई जिवंत होती, हे म्हणणे चुकीचे आहे. सईबाई मृत्यू पावली, त्या वेळी युवराज संभाजी दोन वर्षांचा असून ह्या- वेळी तो सहा वर्षांचा होता;ष जिजाऊ आऊसाहेबही त्याचा प्रतिपाल करीत होती.