पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६५)

अदिलशहानें त्यास आपण होऊन शिवाजीची समजूत घालण्याची कामगिरी सोपविली. तेव्हां " माझा पुत्र ( शिवाजी ) माझ्या स्वाधीन नाहीं, हें सर- कारास विदित आहेच; तथापि होईल तितका यत्न करून पाहतों असें अदिलशहास कळवून शहाजी कर्नाटक प्रांती परत गेला. महाराष्ट्रांत येण्याची तयारी केली व शिवाजीस ही हकीकत कळविण्यांत आली. ती ऐकून जिजा बाई व शिवाजी या उभयतांना अत्यानंद झाला. शिवाजीनें शहाजीस तसे कळविलें, व वडिलांच्या स्वागताची तयारी करण्यास त्याने मोठ्या उत्साहाने व जारीने सुरवात केली.

 शहाजीने कर्नाटक मधून निघण्यापूर्वी ज्योतिषी बोलावून या वेळी आपले ग्रह कसे आहेत, " या बद्दल विचारपूस केली; व ज्योतिषांनी ते उच्चीचे व फायदेशीर आहेत, असे सांगितल्यावर चांगला दिवस पाहून, आपले दुसरे कुटुंब तुकाबाई, आणि कनिष्ठ पुत्र व्यंकोजी व कारभारी त्रिंबक नारायण हृणमंते यांना बरोबर घेऊन, मोठ्या वैभवानें, पुष्कळ परिवार व लवा- जमा यांसह तो दक्षिण प्रांतीं येण्यास निघाला. कूच दरकूच करीत प्रथम तुळजापूर येथे येऊन तेथील कुलदेवता श्रीभवानी हिचे दर्शन घेतले. शिवा- जीने स्वराज्य संस्थापनेचा उद्योग सुरू केल्यानंतर, त्याच्या स्वराज्य संस्था- पनेस यश आल्यास " आपण एक लक्ष रुपयाचें सोनें घेऊन, त्याच्या मूर्ती घडवून त्या श्रीस अर्पण करूं" असा शहाजीनें तुळजापूर येथील श्रीभवानी देवीस नवस केला होता; त्याप्रमाणे त्यानें एक लक्ष रुपयांचे सोनें खरेदी करून व उत्तम कारागिरांकडून त्याच्या मूर्ती घडवून, त्या त्यानें कर्नाटकमधून आपल्या बरोबर आणल्या होत्या. त्या त्याने ह्या प्रसंगी श्रीदेवीस अर्पण केल्या. नंतर


 * तुळजापूर हे ठिकाण निजामच्या राज्यांतील नळदुर्ग जिल्ह्यांत एक तहशिलीचे गांव असून तें जी. आय. पी. रेलवेच्या पुणे- रायचूर मार्गावरील माढा ( सोलापूर जिल्ह्यांतील एक तालुक्याचे ठिकाण ) रेलवे स्टेशन पासून अजमायें तांस मैलांवर आहे. येथील देवास श्रीभवानी ऊर्फ तुकाई देवी असें ह्मणतात; व दरवर्षी आश्विन महिन्यांत ( आक्टोबर ) येथे फार मोठी यात्रा भरत असते.