पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६४)

झाला होता. शिवाजीनें बाजी घोरपड्याचा निकाल उडविल्यामुळे त्या आनं- दांत भर पडून त्याला शिवाजीबद्दल मोठी धन्यता वाटू लागली होती; आणि आपल्या ह्या स्वराज्यसंस्थापक, वैभवशाली, पराक्रमी, व सद्गुणसंपन्न पुत्राची भेट घ्यावी, आपली पुणे प्रांतांतील जहागीर, जिजाबाई, युवराज बाल संभाजी, व इष्टमित्र वगैरेंना स्त्रनेत्रांनी पहावें, कुलस्वामी जो शिखर शिंगणा- पूरचा शंभू महादेव त्याचें व कुलस्वामिणी जी तुळजापूरची श्रीभवानी तिचे दर्शन घ्यावें, अशो त्याला सारखी उत्कंठा लागली होती. इतक्यांत


तमगौड तर्फेहूनहि ताजो खबर आली की कुंदगोलकरास आपले लोकांनी शिकस्त दिधली होती. अमा तो मागती सवारौनु कोटास एउनु दिल- गोव्याची फिकीर करितो. मदत नव्हता जागा राहणार नाहीं. अजो वास्ता हजरत साहेबहि पेशजीच रजा दिवली होती. म्हणौनु छ ४ माद्दे सेवाली कपली साहेबाचे लोकाचे व कनकवेलांकराचे लोकाचे हवाले करुनु आपण स्वार जाल. एक मजली आलियावरी आनेगोदोकार व हलालखोर हे दूर गलथ मालूम करणाराचे बले करुनु आले आहेती, तेहि पादशाही लोकावरी हिस्सा करुनु कपली त्याजपासुनु घेतली हे खबर आपण कपलीस आलियावरी पाहरा रात्री आपल्यास आली होती. ते पेशजांच लिहिली आहे. पेशजी सिदी अजब सिदी संबूल आलियावरी आना गोदीस व कपलीस व बाजे विलायतीस दखल होऊ देतील की ने देतील हे दि पेस्तर रोशन होईल. सेंभरा वर्षांचे मुठमई त्यास गोशमाल देउनु मुठमर्द हरामखोरास जेद्दी देविले असतील त्यास याचा जबाब पुसिला पाहिजे. साहेब अजो सबा जम- जम स्वार होउनु येतील म्हणौनु सवूरी करुनु दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली. आमासाहेबाचे यावयास मातल जाले. मग आपण पाद- शहाचे रजेवरुनु स्वार होऊनु बलदारी नजदीक आलो. पुढेही दरभजला तामगौड तर्फेस जात आहों "

 या पत्रावरून शहाजीच्या मनोवृत्तीची व तत्कालीन राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन आपले महत्व प्रस्थापित करण्याच्या प्रवृत्तीची योग्य कल्पना करितां येते.