पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४३ )

ताके लगावील हे मॉगल व विजापूरकर या दोघांच्याही स्पप्नांतसुद्धा त्या वेळी आले नाही.

 "शिवाजीने स्वतंत्र राहून निराळे राज्य करावें, ही कल्पना शहाजौला सुचली खरी, पण तो अशा बिकट परिस्थितीत सांपडला होता की, ती अम- लांत आणितांना फार सावधपणाने वागणे त्यास प्राप्त होते. शिवाजीचा जन्म झाल्यादिवसापासून शहाजीचा सर्व काळ लढायांच्या घामधुमीत गेल्यामुळे मुलाचा सहवास त्याला फारच थोडा लाभला होता. मुलगा मोठा होऊं लागला तसतशी त्याची चालचर्या पाहून आपला बेत पक्का करणे त्यास जरूर होतें. त्यासाठी त्याने सन १६३८|३९त व पुढे १५२१त शिवाजीस आप- णांकडे बोलावून जवळ ठेवून घेऊन परीक्षा पाहिली. त्यांत उदयोन्मुख अ पूर्व तेज त्याच्या चांगलेच दृष्टोप्तत्तास आले. मग त्याने आपल्या कारभारी मडळाशी खलबत करून पुढे योजिलेला बेत पार पाडण्यासाठी एव्हापासून एक एक पाऊल धीरे धीरे कसें टाकावयाचे हा निश्चय ठरविला. नंतर जिजाऊ आपणांस आवडत नाहीं, शिवाजी आपल्या मर्जीबाहेर बागणार, सबब जवळ ठेवण्याच्या सोयीचा नाही, असे खै टेंच निमित्त ठेवून त्या दोघां- सही आपणांप सून दूर पुण्यास ठेवण्याची मसलत योजिली; आणि त्यास विश्वासू दिवाण दादोजा कोंडदेव याजबरोबर पुण्यास रहावयास पाठविलें, आणि त्याबरोबरच आपले कारभारीमंडळही कोणत्याना कोणत्या तरी निमि- ताने तिकडे रवाना केलें. "

 यावर कोणी अशा शंका घेईल की, शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली, "ती शहाजीच्याच प्रेरणेकरून केली, असे तुम्ही सांगतां, पण बखरीत किंवा तवारिखोत याबद्दल उल्लेख नाहीं. अथवा त्या अभिप्रायाचा शहाजीचा लेखही कोठे मिळालेला नाही. मग तुम्ही म्हणती है खरें कशावरून ? या शंकेला उत्तर एवढेच की, शहाजी मोगलाचा प्रतिद्वंद्वी होता, तोपर्यंत तवारीख- चारूयांनी त्याचा थोडा बहुत परामर्ष घेतला. बाकी गोष्टीबद्दल खोल पाण्यांत शिरून शोध घेण्याचें या तिन्हाइताना काय कारण १ बखरी लिहिणारांनी या बद्दल कांही लिहावयाचे, पण त्याची शहाचीबद्दलची माहिती किती कोती व अव्यवस्थित आहे, हे पूर्वी सुचविलेंच आहे. आतो शहाजांच्या लेखाविषय