पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४४ )

पाहिले तर ज्यांच्या तावेदारींत त्याला रहावयाचे, त्यांच्याच राज्यावर तूं घाल घालीत जा, असें तो शिवाजीला पत्र लिहून कळवील १ असली धोक्याची व गूढ कारस्थानें हे मुळी पांढऱ्यावर काळे करण्याचे विषयच नव्हत. अत्यंत विश्वासू माणसाबरोबर निरोपानिरोपी या गोष्टी चालावयाच्या. तेव्हां या बाबतींत शहाजीच्या लेखाची अपेक्षा करणे वेडेपणाचे होय.”

 पण एवढ्यावरून आम्ही म्हणतों, याला कांहीं आधार नाहीं असे मात्र कोणी समजूं नये. आमचें विधान सिद्ध करण्यास वाचकांची खात्री होण्या जोगें पुष्कळ मुद्दे आम्हांस दाखवितां येतील. ते मुद्दे असे:- जिजाऊ व शिवाजी यांजबरोबर शहाजीनें दादोजी कोंडदेवास जहागीर सांभाळण्याकरितां पुण्यास पाठविले, हें योग्यच झाले; पण यांबरोबर शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्पंत मुजुमदार, सोनोपंत डबीर, व रघुनाथ बल्लाळ सबनीस हे चार इसम जे शहाजीनें पुण्यास पाठविले, ते कशाकरितां ? जिथे गादीची जागा असते, जिथे राज्याचा कारभार चालतो, तेथें पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस इत्यादि अधिकारी लागतान, पुणे परगण्याचा शेपन्नास खेड्यांचा कारभार ओवरायला दादाजीसारखा महालकरी बस्स होता. त्याला पेशवे, मुजुमदार कशाला पाहिजेत. शहाजीच्या अनेक संकटकाळी उपयोगी पडलेले मुलकी व लष्करी कामांतले वाकबगार, शत्रूचे किल्ले व ठाणी फितुरानें किंवा हल्ल्याने घेण्यांत तरबेज असलेले, असे हे मलिकंबरच्या वेळेपासूनचे शहा- जीचे विश्वासू कारभारी यांनी पुण्यास राहून काय करावयाचे होते ? जिथे शेतांभाती करावयाची असते तिथें इत्ती कशाकरितां लागतात १ हे कारभारी लोक पुण्यास नेहमी राहण्याकरितां पाठविण्यांत राज्यस्थापनेखेरीज शहा- जांचा दुसरा कांहीं हेतु दिसत नाहीं. "

 “शिवाजी दहा वर्षांचा होता, त्यावेळचा म्हणजे इ० सन १६४० तला त्याचा शिक्का आहे तो असाः --

॥ प्रतिपश्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||
|| शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भाति यशस्विनी* ॥



 *अर्थ:- प्रतिषदेच्या चंद्ररेखेप्रमाणे वाढत जाणारी, व सर्व जगाला वंद्य अस- लेली, अशी, शहाजीचा मुलगा शिवाजी याची कीर्तिदायक मुद्रा प्रकाशमान होते.