पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४२ )

 शहाजीचें इ० सन १६३७६या पुढील चरित्र जुळविण्याची साधनें फारशी उपलब्ध नाहीत; तथापि जी. थोडांशी उपलब्ध आहेत, त्यावरून सुद्धा शहाजाचे कर्तृत्व सहज सिद्ध होत आहे. "शहाजी हा विजापूरकरांच्या -नोकरीत शिरल्यानंतर, ( भा. इ. सं. मंडळ; त्रैमासिक; अंक पहिला; -मालोजी व शहाजी हा रा. खरेशास्त्री यांचा निबंध पहा.) पहिल्या तीन चार वर्षांत शहाजीच्या मनोवृत्तांत जो क्षोम उत्पन्न झाला त्यांतच शिवाजीच्या राज्यस्थापनेचें बीज आहे. राज्यसंस्थापकाच्या पदवीस पोचलेल्या शहाजीस है परमुलखांत सेवावृत्तांचें लाजिरवाणे जिणें पतकरणें कशामुळे प्राप्त झाले ? मोंगलांच्या नावाने तो जळत होताच; पण विजापूरकरांनी आयत्या वेळी आपणांस दगा देऊन स्वतःचा स्वार्थ स धून घेतला, याबद्दल त्याचें मन फार दुखा- चलें होतें. “ महंमद अदिलशहानें विश्वासघात करून माझे राज्य बुडविले, आणि जहागीर दिल्याचा उपकार दाखवून मला हद्दगरीची शिक्षा भोगा- ·चयास लाविले; ज्यांच्या मांडास मांडी लावून बसण्याचा योग्यता आपण संपादन केला होती, त्यांचीच अतां ताबेदारा सोस वी, चाकरी करावी, मर्जी घरावी, असे दिवस आपणांस प्राप्त झाले ! आणि इतके असून याबद्दल तोड़- तून अक्षरही काढण्याची सोय नाहीं, हा गुपित मारा निमूटपणें यावज्जीव सोसलाच पाहिजे, " असे विचार उद्भवून त्याच्या मनास फर खेद बाटे ! ‘‘ ज्यांनी हे सर्व केलें, त्या शत्रूवर अगर हितशत्रूंवर सूड उगविण्याच्या संधी आता माझ्या आयुष्यांतून निघून गेल्या. तर मग या अपमानाचें परि- मार्जन, कुणी कर वें १ दें उसने कोणी फेडावे ? असे जेव्हा जेव्हा त्याच्या मनांत येई तेव्हां तेव्हां शिवाजीची आठ वर्षांची छोटी मूर्ती त्याच्यासमोर उभी राही ! करील तर हे सर्व माझा शिव जीच करील असे त्यास वारंवार वाटे. हा त्याचा अंदाज पुढे किती पूर्णपणे खरा ठरला ! शहाजी हा परा- क्रमी कारस्थानी पुरुष - हा राज्यकाती करणारा चळवळ्या- दक्षिणेत राहूं दिला तर आपली राज्ये नांदूं देणार नाही, असे मनून दिल्लीचा शहाजहान विजापूरचा महंमद यांनी शहाजीस कर्नाटकांत डांबून घातलें, व पुन्हां त्यान दक्षिणेत येऊं नये असा बंदोबस्त केला. पण पुढे लवकरच बापाहूनसुद्धो परा कमानें अधीक दैदीप्यमान शिवाजी आपल्या राज्यांवर एकाहून एक भयंकर
-