पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४१ )

दोन्ही अटी मान्य केल्यासारखें करून आपली सुटका करून घेतली. याबद्दल शिवाजीस अतीशय राग आला; X त्याला शहाजीची ही धरसोड व तज्जन्य मानहानी बिलकूल पसंत पडली नाहीं; तथापि तो पितृभक्त असल्याने त्यानें वडिलांस ( शहाजीस ) एक शब्दानेंही दुखविले नाहीं; परंतु शहाजीचे घोरण कसे चुकलें याचें मनन करून त्या चुका आपल्या हौतून घडूं नयेत म्हणून शिवाजीनें पूर्ण खबरदारी घेतली; व तीच त्याच्या स्वतंत्र स्वराज्य संस्थाप- नेच्या कार्याला पुष्कळ वेळां प्रमुखत्वानें मार्गदर्शक ठरली.


 xपरमानंद कवीकृत "शिवभारत" या काव्यपंथाच्या सोळाव्या अध्यायत, ( इतिहास मंजरी, भाग १ पहा.) अर्से वर्णन केलेलें आहे कीं, शके १५७१ मध्ये, शहाजीस कैदेतून सोडतांना विजापूर दरबारानें (१) संभाजीनें बेंगरूळ सोडावें, आणि (२) शिवाजीनें सिंहगड सोडावा, अशा दोन मानहानीकारक अटी घातल्या; व त्या शहाजीनें मान्य करून प्रतिबंधांतून • आपली मुक्तता करून घेतली; वास्तवीक पाहतां संभाजीनें फरादखानाचा परराभव करून, व शिवाजीनें मुसेखान व फत्तेखान यांनां धुळीस मिळवून, (व अदिलशहास मोंगली बादशाही शह देऊन ) शहाजीच्या मुक्ततेची तजवीज केली होती; परंतु महंमद अदिलशहाच्या उपरीनिर्दिष्ट दोन्हीही आपमानकारक अटी शहाजीनें मान्य करून आपली सुटका करून घेतली; हे ऐकून शिवाजीस अतीशय राग आला, व त्याने आपल्या वडिलांचे धोरण कसे चुकत आहे, वडिलांनी मुसलमानी राज्यकर्त्यांची नौकरी इमाने इतबारें केली, आपला सर्व जन्म त्यांच्या सेवेत घालविला, तरी त्यांच्या हातून म्हणण्याजोगी महत्वाची काम- गिरी झाली नाहीं, उलट दुटप्पी वर्तनामुळे त्यांच्यावर कैदेचा मात्र प्रसंग आला, तेव्हां यवनांच्या नौकरीत महत्व प्राप्तकरून घेण्याचा प्रयत्न किती व्यर्थ आहे, यासंबंधी आपले विचार आपला वृद्ध मुत्सद्दि सोनाजी पंडित ( सोनोपंत डबीर) यांजजवळ बोलून दाखविले, व विजापूरकरावर स्वारी करण्याचा निश्चय केला; त्यावेळी सोनाजीपंतांनी खरी राजनीति कोणती हे सांगून त्याचा राग शांत केला; यासंबंधी तंजाउरचा शिलालेख पृष्ठ २४ ( बृहदीश्वर शिला- लेख) मधील उतारा, व इतर विवेचन पुढें चवथ्या परिच्छेदांत " शहाजीची. योग्यता " या सदराखाली केलेले आहे.