पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१३६)


बद्दल त्याला मोठाच विचार उत्पन्न झाला. त्याला स्वतःलाही प्रारंभी आदिलशहानें विजापूर येथें बोलाविलें होतें, आणि खुद्द शहाजीकडूनही त्यास विजापूर येथे निघून येण्याबद्दल पत्र पाठविलें होतें. परंतु माता जिजाबाई व पत्नि जिजाबाई, व इतर मंडळींनी त्यास विजापूर येथें जाण्याची सल्ला दिली नाहीं म्हणून त्यानें तो बेत टाळला; मोंगल बादशहा शहाजहान यांजकडे वकील पाठवून व त्याच्यामार्फत, आपण बाद. शाही नौकरी करण्यास तयार भाहों " असे बादशहास, व त्याचा दक्षिण प्रांताचा सुभेदार असलेला मुलगा शहाजादा मुरादबक्ष यांस कळवून तिकडे संधान बांधिलें; व आदिलशाही प्रदेशांत धुमाकूळ माजविण्यास सुर- वात केली. तेव्हां महंमदशदानें बल्लाळ बेडर, फत्तेखान व मुसेखान या तीन सरदारांना शिवाजीवर रवाना केले. या वेळी शिवाजी पुरंदरच्या किल्लयांत होता. त्यामुळे हा किल्ला हस्तगत करून घेण्याची कामगिरी फत्तेखान व मुसे- खान या उभयतांनी आपणाकडे घेतली व बल्लाळ बेडराकडे, पुरंदरपासून तीन कोस पलीकडे असलेला शिरवळचा किल्ला हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली. त्याप्रमाणे बेडरानें येऊन शिरवळचे ठाणे काबीज केले. या वेळी शिवाजीचा सरदार भीवराव हा शिरवळच्या आसपास होता; त्यानें शिरव- ळच्या ठाण्याचे योग्यप्रकारें संरक्षण न करितां तो शिवाजीकडे परत आला; परंतु हे त्याचें वर्तन शिवाजीस पसंत पडले नाहीं; त्यानें भींवरावास आल्या पावलानें परतून शिरवळचें ठाणे पुन्हां इस्तगत करून घेण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे भींवरावाने तिकडे जाऊन मोठ्या त्वेषानें हल्ला चढवून शिरव- ळचा किल्ला हस्तगत केला; त्या वेळी उडालेल्या चकमकीत बल्लाळ बेडर ठार झाला, व त्याच्या उरलेल्या सैन्याची पूर्णपणे पांगापांग उडाली. इकडे फत्ते- खान व मुसेखान यांनी पुरंदरवर हल्ला चढविला; पण तो शिवाजीनें परतून लाविला; तेव्हा इरेस चढून संधी साधून त्या उभयतांनी पुन्हा निकराचा इल्ला चढवून ते थेट किल्ल्याच्या दरवाजाशी येऊन भिडले; तेव्हां त्या ऐन आणिबाणांच्या प्रसंगी शिवाजी आपल्या कांही निवडक सैन्यासह किल्ल्याच्या बाहेर पडून शत्रूसैन्यावर मोठ्या निकरानें तुटून पडला; व त्या सैन्यास त्यानें तेथून पिटाळून लाविलें. त्या खणाखणीत मुसेखान प्राणास मुकला, व