पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३५)


घेऊन मुस्तफाखानाच्या ताब्यांतील प्रदेश सारखा हैराण करण्यास सुरुवात केली; फरादखानाचा पराभव करून त्याला पळवून लाविलें, आणि मुस्तफा- खानासही तो आटोपेनासा झाला; पण एवढ्यानेंच मुस्तफाखानाच्या मागील पीडा संपली असें नाहीं; संभाजीचे उदाहरण पाहून अदिलशहाचा उभा दावेदार असलेला चित्रकल येथील नायक बिच्चकती भरमा यानें होच संधी साधून अदिलशहाविरुद्ध मोठ्या जोराची उठावणी केली; चित्रकलकर भरमा हा मोठा शूर ये द्धा होता; पराक्रमी सेनानायक होता; कर्नाटकातील एक अत्यंत संपत्तिमान संस्थानिक होता; त्याची लष्करीशक्ति दांडगी होती; त्याच्या सैन्याची सान्या कर्नाटकांत " कजाख " म्हणून ख्याती होती; "मूर्तिमंत काळ म्हणून प्रख्याती होती, अदिलशाही सैन्यास तर त्यानें केव्हाच खाऊन टाकिले असते; पण निव्वळ शहाजीचा दरारा, कर्तबगारी, परराक्रम, व लष्करी बळ यांना दबूनच शहाजी कर्नाटकांत होता तोपर्यंत भरमा आदिलशहाविरुद्ध कोणतीही गडबड न करितां स्वस्थ राहिला होता; तो इतका श्रीमान होता, की त्याच्या तरवारीचें म्यान सोन्याचे होतें, व त्याच्या स्वारांच्या तरवारीची भ्यानें रुप्याची होतीं; तो तीन हजार घोडे- स्वारांचा मालक होता; आणि या घोडेदळाशिवाय त्याच्या संग्रही तीन हजार जबरदस्त पायदळ होतें. असा हा अदिलशहाचा एक कट्टा दुष्मन असलेला जबरदस्त प्रतिस्पर्धी, कर्नाटकांतीलं शहाजांचे दडपण नाहीसे झाल्या- बरोबर आदिलशहावर उलटला; एकाद्या जंगी तुफानाप्रमाणे आदिलशाही सैन्यावर कोसळला. त्यानें विजापूरकरांच्या प्रदेशांत लूटमार करून मनस्वी धुमाकूळ उठवेला, व थेट विजापूरपर्यंत चाल करून येऊन खुद्द विजापूरची पेठही त्यानें लुटून फस्त केली. थोडक्यांत म्हणजे संभाजी व भरमा यांच्या बंडाळीमुळे सर्व कर्नाटकभर पुन्हां दंगेधोपे सुरू झाले. आदिलशाही अंमल बहुतेक उठल्यासारखा झाला. शहाजीला पकडल्यानें, गांधील माशांचे मोहोळ उठल्याचा अनुभव महंमदशहास व आदिलशाही दरबारास पूर्णपणे येऊन चुकला; व याच वेळ इकडे शिवाजीनेंही तशीच घामधूम उडविल्यामुळे भरोत भर पडून महंमदशहा व त्याचा दरबार अत्यंत चिंतामन होऊन गेला. शहाजीच्या जिवावर बेतल्याचें शिवाजीस कळतांच पुढे काय करावें या-