पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३७ )

फत्तेखान व अदिलशाही सैन्य तेथून जीव घेऊन पळालें. अशा रीतीनें तिकडे कर्नाटकांत संभाजी व भरमा व इकडे पुणे प्रांतांत शिवाजी यांनी आदिल- शहाचा पूर्ण बोजवारा उडवून दिल्यामुळे तो अतीशय गांगरून गेला; इतक्यां- तच, “शिवाजीनें शहाजहान बादशहाशीं संधान बांधिले त्यांत तो यशस्वी झाला, व बादशहाची मदत घेऊन तो अदिलशाही प्रदेशावर स्वारी कर- णार आहे, " अशी महंमद आदिलशद्दास बातमी समजली; त्यामुळे तर त्याचें घाबेंच दणाणले; व या प्राणसंकटांतून सुरक्षितपणे कसे मुक्त व्हावें, या विवंचनेत तो पूर्णपणे मग्न होऊन गेला.

 ह्या वेळीं दिल्ली येथें बादशहा शहाजहान हा राज्य करीत असून निजामशाही राज्याच्या वांटणीत मोगल बादशाहीच्या अमलाखाली जो प्रदेश आला, स्यावर "दक्षिण प्रांताचा सुभेदार " म्हणून बादशाहानें आपला मुलगा मुरादबक्ष यात्री नेमणूक केली होती. ह्या बादशाही प्रदेशाचा बंदोबस्त आदिळ- शाही प्रदेशाच्या मानानें पुष्कळच चांगला होता; आणि मोगल बादशहा व विजापूरकर आदिलशहा या उभयतां सत्ताधान्यांशीं एकदम वैरभाव सुरू केल्यास आपला निभाव लागणार नाहीं, हें शिवाजी पूर्णपणे जाणून होता; म्हणून जरी त्यानें आदिलशाही प्रदेशास पुष्कळ उपद्रव दिला होता, व त्या राज्यांतील कांहीं प्रदेशही हस्तगत करून घेतला होता तरी मोंगली प्रदेशास स्यानें यत्किंचितही उपद्रव दिला नव्हता. त्यामुळे मोंगली बादशहीशी त्याचा 'तिळमात्रही वैरभाव उत्पन्न झाला नव्हता. शिवाय दक्षिणेतील मुसलमानी राज्ये नष्ट करण्याचा शहाजहान याचा निश्चय ठरून चुकला होता; त्यामुळे आदिल- शाही राज्याविरुद्ध शिवाजीनें माजविलेल्या जोराच्या बंडाळीमुळे, शहाजहान यांस वाईट न वाटता उलट समाधानच वाटत होतें. ही राजकीय परिस्थिती शिवाजीच्या पूर्णपणे ध्यानांत होती. म्हणून त्यानें शहाजहान बादशहाकडे दादोजी कोंडदेवाच्या काळांतील जुना कारकून रघुनाथपंत यांस वकील म्हणून पाठविलें; व "आपण बादशाही नौकरींत येण्यास तयार आहों" असे त्याच्या मार्फत शहाजहान यांस कळविलें. शहाजहान यानेही शिवाजीची विनंती तात्काळ मान्य केली. शहाजीस आपल्या नौकरीत ठेवून शिवाजीस पांच हजारी -मनसब देण्याचें त्यानें अभिवचन दिलें; आणि शहाजीस बंधमुक्त करण्या