पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२५ )

दरबार व खुद्द अदिलशहा यांसही शहाजीविषयीं संशय उत्पन्न झाला होता, आणि रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर आसदखान, रुस्तुमजमान, अहमंदखान वगैरे सरदार शहाजीच्या जोडीला, त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेव ण्याला, कर्नाटक प्रांती पाठविण्यांत येत होते; रणदुल्लाखान मृत्यू पावला त्या सुमारास शहाजीचे हितशत्रू मुस्तफाखान व अफझलखान या उभयतांनी महमंदशहा व त्याची आई बडीसाहेबीण या उभयतांचे मन शहाजीविषयी अतिशय कलुषीत केलें; व " शहाजी हा अंतस्थरित्या कर्नाटकमधील पाळे- गारांना व राजकर्त्यांना आपल्याविरुद्ध चिथापणी देत असून, आपणावरही उलटण्याचा त्याचा इरादा आहे" असे त्यांच्या मनांत भरवून दिलें; त्यामुळे अदिलशहाच्या मनांत शहाजीविषयी अतिशय भीति उत्पन्न झाली; आणि त्याची आई बडीसाहेबीण हिनें तर शहाजी दरवर्षी पर्जन्यकाळी विजापूर येथे आल्यावर, मुलुखगिरी केल्याबद्दल त्याचा सन्मान न करितां, उलट मानभंग करण्यास सुरवात केली. इतक्यांतच, रणदुल्लाखानानें आपल्या मृत्यूपूर्वी शहा- जीस असा गुप्त इषारा दिला की, " तुम्हांला दरबारांत शत्रू उत्पन्न झाले आहेत, तेव्हा या उपरि तुम्हीं विजापुरी राहूं नये; जहागिरीवर बंगळूरासच राहणें करावें " ( शिवदिग्विजय: पान १४७). त्यामुळे शहाजीनें बरसा- तीत विजापूर येथे छावणीस येण्याचें अगदींच बंद केलें, इतकेंच नाही तर खुद्द अदिलशहानें त्याला विजापूर येथे येण्याविषयीं दोन तीन निरोप पाठविल, तरी सुद्धा त्यानें कांहोना कांही सबब काढून तिकडे जाण्याचे टाळले; तेव्हा शहानें आपला वजीर, व शहाजीचा हितशत्रू जो मुस्तफाखान त्यास, शहा- जीच्या हालचालीवर देखरेख ठेवण्याकरितां, इ. सन १६४७ मध्ये, कर्नाटक प्रांत रवाना केले.

 शहाजी हा सैन्य, तोफखाना वगैरे सरंजामानिशी जय्यत असल्यामुळे, त्याला राजरोसपणे कैद करण्याची अदिलशहा अथवा मुस्तफाखान यांची प्राशा नव्हती; इतकेच नव्हे तर तसा नुसता उद्देश जाहीर करणे त्यांच्या शक्ती- बाहेरचें होतें; अर्थात्, मुस्तफाखानाला कर्नाटक प्रांतांत पाठविण्याला महंमद अदिलशहाला एक निराळेच कारण म्हणजे विजयानगरकर श्रीरंग नायक याच्यावरील स्वारी, हैं कारण जाहीर करावें लागलें; यावेळी श्रीरंग नायक