पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १२४ )

अशा रीतीनें शहाजी कर्नाटकांत स्थाइक झाल्यानंतर त्यानें, तिकडील प्रजेस प्रेमानें वागवून, व जमीनमहसुलीची उत्तम व्यवस्था ठेवून व वसु लाची ठरीव रक्कम विजापूर येथे नियमीतपणें पाठवून, पुष्कळ संपत्ति संग्रही ठेविली; साधल्यास आपण कर्नाटकमध्ये स्वतंत्र राज्यसंस्थापना करावी, असा शहाजांचा उद्देश होता, व त्यामुळे, लोकसंग्रह व धनसंचय करून व सैन्य, व तोफखाना वगैरे सरंजाम नेहमी उत्तम व जय्यत स्थितींत ठेवून तो आपली शक्ति सारखी वाढवीत होता; परंतु शहाजीच्या ह्या वाढत्या वर्चस्वा मुळे अदिलशाही दरबारांत त्याच्याविषयी मत्सर व द्वेषभाव उत्पन्न झाला. या वेळी मुस्तफाखान हा अदिलशाही राज्याचा वजीर होता, व अफझल- खान हा त्याचा स्नेही व मदतगार होता; या उभयतीचें मन शहाजीविषयीं शुद्ध नसून, ते त्याला आपला शत्रू समजत असत; मुस्तफाखान व अफझल खान हे एक पक्षाला, व रणदुल्ला खान, खवासखान, व मुरारपंत हे दुसन्या पक्षाला, अशी आदिलशाही दरबारांत स्थिती होती; या दोन पक्षांचें वैर पर- भावधीस गेलेलें होतें, आणि रणदुल्लाखान, खवासखान व मुरारपंत यांचा व शहाजीचा अत्यंत स्नेह होता; त्यामुळे मुस्तफाखान व अफलखान हे शहाजीस आपला शत्रू"असें समजत होतें. खवासखान हा अदिलशाही राज्याचा वजीर होता तोपर्यंत शहाजीस, आपला विरुद्ध पक्ष वर डोकें काढील अशी फारशी भीति बाळगण्या चेंकारण नव्हते; परंतु खवासखान व त्याचा उजवा हात मुरारपंत यांचे मुस्तफाखानाच्या मदतीनें खून झाल्यानंतर शहार्जाचा मोठाच आधार नष्ट झाला; व उलटपक्षी मुस्तफाखान हा वजीर होऊन त्याचा पक्ष जोरांत आला; तथापि शहाजीचा स्नेही रणदुल्लाखान हा जिवंत असल्यामुळे शहाजीस त्याचा पुष्कळच आधार होता; व त्यामुळेच विरुद्ध पक्षाच्या कारस्थानांना पुष्कळच आळा बसलेला होता; तथापि इ. सन १६४३ मध्यें रणदुल्लाखान मृत्यू पावल्यानें शहाजीचा तोही आधार नष्ट झाला, व शहाजीच्या शत्रूस त्याच्या विरुद्ध कारस्थानें कर- ण्यास उत्तम संधी प्राप्त झाली. शहाजीने कर्नाटक प्रांतांत गेल्यानंतर तो प्रदेश चार पांच वर्षांतच जिंकून आदिलशहास मिळवून दिला; पण त्याबरोबरच शहाजीनें आपले वर्चस्वही अतीशयच वृद्धिंगत केलें; त्यामुळे अदिलशाही