पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२६ )

न्याने अदिलशहाविरुद्ध जाहीररीत्या शस्त्र उगारलें होतें. त्याचा मांडलीक बदनूरकर शिवाप्पा नायक याची त्याला मदत होती; त्यानें भारी फौज जमविलेली होती; तो जय्यत तयारीत होता; बेदनूरच्या डोंगराळ प्रदेशाचा आश्रय घेऊन त्याने आजूबाजूच्या आदिलशाही प्रदेशांत मोठाच धुमाकूळ उडवून दिला होता आणि अदिलशाही सैन्याशी झालेल्या कित्येक लहान मोठ्या चकमकीत त्यांनी त्या सैन्याचा पराभव केला होता; त्यामुळे त्या उभयतांना नामशेष करण्याच्या दर्शनी उद्देशानें महंमदशहा यानें मुस्तफाखानाची कर्नाटक प्रांती रवानगी केली; व शहाजी, आसदखान, व विजयानगरकर श्रीरंगनायक याच्या ताब्यांतील गंडीकोट + ह्या किल्लयास वेढा देऊन बसलेला अदिलशाही सरदार सिद्दी रैदान यांना मुस्तफाखानास जाऊन मिळविण्याविषयीं हुकूम ‘पाठविले; त्याप्रमाणें हे तीन्हींही सरदार आपआपल्या सैन्यासह मुस्तफाखानास येऊन मिळाले; व उमयतांमधील युद्ध जोरात येण्यास सुरुवात होऊन येल्लूर X येथे एक मोठेंच निकराचें युद्ध झाले; ( इ. सन १६४७). त्यावेळी मुस्तफा खानाचे सैन्य मध्यभाग, व त्याच्या उजव्या बाजूस सिद्दी रेहान व डाव्या बाजूस शहाजी व आसदखान हे होते; बेदनूरकराकडील सरदार दामलवाड यानें मध्यभागी असलेल्या मुस्तफाखानाच्या सैन्यावर मोठ्या निकराचा हल्ला करून त्याचे खास लष्कर फोडून भन केलें, व शहाजी व आसदखान यांच्या सैन्यावर चाल करून जाऊन आसदखानासही जखमी केलें आणि त्यावेळी मुस्तफा खान हा युद्धभूमीपासून जवळच एका टेकडीवरून हा युद्धचमत्कार


 + गंडीकोटा, गंडीकोट, ऊर्फ गंजीकोटचा डोंगरी किल्ला मद्रास इलाख्यां- तील कडाप्पा जिल्ह्यांत येर्रा मलईच्या डोंगरांत ( Yerramalai moun- tains ) असून, तो समुद्रसपाटीपासून १७६० फूट उंचीवर असून, पूर्वकाळी तो विशेष मजबूत म्हणून त्याची प्रसिद्धी आहे.

 x येल्लूर ऊर्फ एल्लूर, एल्लोर ( Ellore ) है गोदावरी जिल्ह्यांत हल्ली एक तालुक्याचे ठिकाण असून, ते राजमहेंद्रीपासून ५५ मेलांवर ताम्मालेर नदीच्या कांठी आहे; व तेथें गांवानजीकच एक किल्ला असून तो हल्लीं मोड- कळीस आलेला आहे.