पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२३ )

दारास अथवा मनसबदारास सरकारांतून जहागीर द्यावयाची असेल, त्यावेळी पूर्वीच्या वसुलाचे हिशोब पाहून नवीन बमाबंदी ठरेल त्याप्रमाणे त्यास उत्पन्न नेमून द्यावें, अशी नवी पद्धति त्याने अंमलांत आणली. त्यामुळे अशा रीतीनें वसूल ठरवितांना इनामें वगैरे बाबी वजा करून निव्वळ आकार कमी किंवा जास्त झाला हे तेव्हांच समजून येऊं लागले. ( पारसनीस; तंजावरचे राज- घराणे हे पुस्तक पहा. )

 शहाजीने तंजावर प्रांत आपल्या ताब्यांत मिळविल्यानंतर, तो तंजावर तेथे राहूं लागला; व “ तंजावर ही जागा चांगली पाहून अंतःकरणांत आपलें राहण्यास योग्य आहे, असे सर्वानुमतें प्रशस्त करून तुकाबाई व व्यंकोजी, व व्यंकोजीची बायको दिपाबाई यांस तेथें ठेविलें, व ती आपली राहण्याची जागा केली. " शहाजीनें तंजावर प्रांत कधीं व कसा मिळविला, याबद्दल मतमेद आहे; तथापि एकंदरीत असे दिसतें कीं, तंजावरचा राज्यकर्ता पंची रंगू आणि मुद्गलचा पाळेगार जंजाप्पा नाईक या उभयतांमध्ये कलह उत्पन्न होऊन जंजाप्पाने शहाजांस आपल्या मदर्तास बोलावून घेतले; व नंतर त्यांचें युद्ध होऊन त्यांत पंची रंगू ठार मारला गेला. त्यानंतर तंजावर प्रांताच्या ताब्याबद्दल शहाजी व जंजाप्पा या उभयतांमध्यें कलह लागून शहाजीने जंजाप्पास ठार मारिलें, व तंजावर आणि मुद्गल हे दोन्हीही प्रांत आपल्या ताब्यांत घेतले. नंतर शहाजीने ही सर्व हकीकत अदिलशाही दरबारास कळ- वून तिकडून या नवीन जिंकलेल्या प्रदेशाबद्दल संमती आणविली; व ते प्र आपला मुलगा व्यंकोजी ह्याच्या नांवानें करून घेतले; तथापि पंची रंगूचा वंशज विजयराघव हा या वेळी जिवंत होता; व शहाजीच्या हयातीत तो सत्ता- हीन व परतंत्र स्थितीत तंजावर येथे अस्तित्वांत होता; पुढें इ० सन १६७५ मध्ये व्यंकोजीने ह्या नामधारी नायक राजास अजिबात नाहीसे करून तंजा- वर येथील प्राचीन चोल मंडलाधिपतीचे सिंहासन हस्तगत केले व त्या ठिकाणी आपली नवी राजगादी स्थापन केली, व याच काळापासून व्यंकोजीच घराणे, " तंजावरचें x राजघराणे " म्हणून ओळखण्यांत येऊं लागलें.


 x या परिच्छेदाच्या शेवटी " तंजावरचें राजघराणे या संबंधी, परि-- शिष्ट पहिलें, यामध्ये लोटक हकीकत दिली आहे, ती पहा.