पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२२ )

मधून मधून कांहीं दिवस बाळापूर उर्फ दोइ बाळापूर येथें व काही दिवस कोलार येथे रहात असे. हा कोलार प्रांत शहाजीच्या ताब्यांत आल्यानंतर त्यानें त्या ठिकाण आपला वडील मुलगा संभाजी यांस ठेविलें, वं त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सुरतसिंग हा कोलारई येथे राहून त्या प्रांतांचा कारभार पाहू लागला.

 शहाजीनें आपल्या ताब्यांतील कर्नाटकमधील प्रदेशाच्या जमाबंदीची उत्तम व्यवस्था लावण्याकरितां दक्षिणेतून कांहीं हुषार व भरंवशाची ब्राह्मण मंडळी तिकडे नेली; + च जमाबंदीची नवी पद्धति सुरू करून सरकारी उत्पन्नाचीहि ही पुष्कळच वाढ केली, व त्यामुळे तिकडील प्रजा सुखी व आबाद झाली. जमाबंदीची नवी व्यवस्था करितांना शहाजीनें प्रथम सर्व परगण्यांची योग्य विभागणी केली; व त्याचें संमत, तर्फ, मौजें, मजरें, असे पोटविभाग केले; व त्यांवर निरनिराळे अंमलदार नेमिलें. पूर्वी छ । प्रदेश विजयानगरच्या राज्यांत मोडत होता त्यावेळी " संप्रति " म्हणून अंमलदार होते; ते शहा- जोनें बदलून देशमूख, देशपांडे, कुळकर्णी, नाडगौड, सर नाडगौड, कानगो, सरकानगो असे नवे अंमलदार, व सर्व परगण्यांत नवे शिरस्तेदार नेमून सर्व प्रांतांचे हिशोब त्यांच्याकडून तयार करविले. शिवाय, ज्यावेळी एखाद्या किल्ले.


शहाजीच्या ह्या अलौकिक पराक्रमामुळे त्याची कीर्ति व बोलबाला सर्वत्र विशेष झाला.

 * दोड्ड म्हणजे मोठें, व चिक्क म्हणजे लहान; दोड्ड बाळापूर हें म्हैसूरच्या राज्यांत, अर्कावती नदीच्या पूर्व किनाऱ्यावर बंगलोरपासून २७ मैलांवर आहे.

 § कोलार हैं ठिकाण बंगलोरपासून वायव्येस पायमार्गानें ४३ मैलांवर, व कोलार रोड रेल्वे स्टेशनपासून १० मैलांवर आहे; या ठिकाण म्हैसूरचा प्रसिद्ध राज्यकर्ता हैदरअल्ली, याचा बाप फत्ते महंमद, याची कबर आहे.

 + या दक्षिणी मंडळांचे वंशज आजतागायत त्या प्रांतांत अस्तित्वांत आहेत; व देशमूख, देशपांडे, कुळकर्णी, शिरस्तेदार, वगैरे दक्षिणी उपनां- वांनी ते हल्लींही " मूळचे दक्षिणी " म्हणून ओळखले जात आहेत.