पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२१ )

शहाजी हा प्रारंभी बंगळूर येथें रहात असे; परंतु त्यानें चिक्क रागल तिम्म- गौडा ह्या पाळेगार राज्यकर्त्यापासून कोलार प्रांत जिंकून घेतल्यानंतर तो


वर होता. तो इतक्यांत ( विजापूरकरांचा प्रसिद्ध सरदार ) अफझलखान हा कनकागरी प्रांतांतून जात असतां बंडखोर गिराइयांची व अफझलखानाची गांठ पडली; बहुत कजाखीचें युद्ध झालें, त्यांत अफझलखानाचा पराभव झाला. हे वृत्त कळतांच ताबडतोब कनकगिरीवर चाल करून घेऊन शहाजीनें कनकगिरीकरांचे पारिपत्य केले. शहाजीच्या ह्या साह्याचें भूषण न मानतां, अफझलखान दूषण मानूं लागला, आणि तेव्हांपासून तो शहाजांचा द्वेष करूं लागला. या मोहिमेंत शहाजी असतां वैशाख शुद्ध पंचमीस शिवाजीचे पहिलें लग्न सईबाईशीं पुण्यास दादाजी पंतांनी उरकून घेतले. ही वार्ता विजापुरीं महंमद आदिलशहास व ( त्याची आई ) बड़ी साहेबीण हीस कळून राजे शहाजी मोहिमेहून राजधानीत परत आल्यावर त्यांनी " मुलाचें लग्न असे गुपचूप को उरकून घेतलें ? " असा त्यास प्रश्न केला, आणि शहाजी राजास हुकूम केला की, मुलास आणून येथेंच समारंभानें त्याचें पुन्हां दुसरे लग्न करावें. तेव्हां जिजाबाई व शिवाजी यांस विजापुरास आणून तेथें शिवाजीचे दुसरे लग्न पुतळाबाई ऊर्फ सोयराबाई इजशी, आदिलशहा स्वतः हजर राहून, आषाढांत मोठ्या थाटानें लाविलें. ह्यावेळीं शक १५६२ त शिवाजीचें वय तेरा वर्षांचे होतें. मुजरा वगैरे न करण्याचा प्रकार जो झाला तो ( शिव- दिग्विजय, १११ व ११२ ) ह्या वर्षांच्या पावसाळ्यानंतर दसभ्याचा दर बार भरला असतां झाला. त्रेसस्ट, चौसस्ट, व पासष्ट, या सालींहि लखमेश्वर वगैरे प्रांतावर स्वाण्या करून, बंकापूर, हरीहर, बसवापट्टण, तालीखेडा, वगैरे तालूके शहाजीनें आस्ते आस्ते अमलाखाली आणिले. पाऊसकाळी शिरस्त्या- प्रमाणें तो छावणीस विजापूरप्रांती येई. १५६६ साली शिरें व बंगळूर हे प्रांत घेऊन म्हैसूरचा पूर्वेकडील प्रांत अदिलशाहीच्या हुकमतींत आला. अली- कडे कांही वर्षे रणदुल्लाखान प्रकृती नादुरुस्त म्हणून विजापुरी राही, व शहाजी एकटाच मोहिमेचे काम संभाळी. शेवटी शके १५६५ त रणदुल्लाखान दुख- यानें वारला, व सदुसष्ट साली शहाजीनें वीरभद्राकडून बल्लारी तालुका घेतला.